नवी मुंबई

आमिषापोटी १८ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक

Swapnil S

नवी मुंबई : अधिक टक्केवारीचे आमिष दाखवून नवी मुंबईतील एका व्यक्तीला तब्बल १८ लाख ९० हजारांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे यातील यातील फिर्यादी व आरोपी एकदाही आमने सामने भेटले नाहीत. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात तीन अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवी मुंबईत राहणारे कपिल शहा यांना ७ डिसेंबर रोजी व्हॉट्सॲपवर एक संदेश आला. त्यानुसार गुंतवणुकीचे चांगली संधी असून एका दिवसातच ३० ते ५० टक्के परतवा मिळू शकतो, असे आमिष दाखवण्यात आले होते. त्यासाठी टेलिग्राम ॲप मोबाईलमध्ये डाऊनलोड करून त्या लिंकवरून गुतंवणूक करावी असे सांगण्यात आले होते. त्यानंतर शहा यांनी स्वत:चा ई-मेल आयडी दिल्यानंतर क्रिप्टोग्लोबवर शहा यांचे खाते बनवण्यात आले. त्याची लिंक शहा यांना पाठवण्यात आली.

फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने स्वतःचे नाव कौशिकी शुक्ला असे सांगितले होते, दुसऱ्या दिवशी शहा यांनी २ हजार रुपये कौशिकी शुक्लाच्या खात्यात गुगल पेद्वारे टाकले. त्याच दिवशी या दोन हजार रुपयांचा परतावा म्हणून २ हजार ८०० रुपये शहा यांच्या खात्यात जमा झाले. त्यानंतर हे खाते मोहन कुमार यांच्याद्वारा चालवले जाईल, असे शुक्लाने सांगितले. त्याने सांगितल्याप्रमाणे शहा यांनी १ लाख ५० हजार भरले. मोठ्या परताव्याची अपेक्षा असताना मुद्दल आणि परतावा हवा असेल तर ५ लाख चाळीस हजार भरण्यास सांगितले.

शहा यांनी तेही पैसे भरले. धक्कादायक म्हणजे १२ लाख भरावे लागतील, असे फोनवरील व्यक्तीने सांगितल्यावर तीही रक्कम शहा यांनी भरली. शहा यांनी एकूण १८ लाख ९० हजार रुपयांची गुंतवणूक केली होती. मात्र तरीही परतवा दूरच पण २८ लाख रुपयांची मागणी केली गेली. अशी विनंती केल्यावर आपली फसवणूक झाल्याची खात्री शहा यांना झाल्यानंतर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात तीन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस