नवी मुंबई

पावणे एमआयडीसीतील महेक केमिकल कंपनीला भीषण आग

पावणे एमआयडीसीमध्ये फार्मास्युटिकल केमिकलची मेहेक केमिकल कंपनी असून या कंपनीत ऑर्गेनिक केमिलक तयार केले जाते.

Swapnil S

नवी मुंबई : पावणे एमआयडीसीतील महेक केमिकल प्रा.लि. या केमिकल कंपनीला गुरुवारी सकाळी ६ च्या सुमारास आग लागल्याने सदर कंपनी या आगीत जळून खाक झाल्याची घटना घडली. एमआयडीसी व महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे २० बंबाच्या सहाय्याने ५ तासांच्या अथक प्रयत्नानंतर येथील आग आटोक्यात आणली. त्यानंतर सायंकाळपर्यंत याठिकाणी कुलिंगचे काम सुरू होते. सुदैवाने या कंपनीत सुरक्षारक्षक याशिवाय कुणीही नव्हते. त्यामुळे या आगीत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. या कंपनीला लागलेल्या आगीचे कारण समजू शकले नसल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

पावणे एमआयडीसीमध्ये फार्मास्युटिकल केमिकलची मेहेक केमिकल कंपनी असून या कंपनीत ऑर्गेनिक केमिलक तयार केले जाते. याठिकाणी सदर कंपनीचे चार युनिट असून गुरुवारी या कंपनीतील एका युनिटमध्ये आग लागली. सदर कंपनीत मोठ्या प्रमाणात केमिकलचा साठा असल्याने सदर आग काही वेळात संपूर्ण कंपनीत पसरली. त्यानंतर सदरची आग आजूबाजूच्या इतर तीन युनिटमध्ये पसरली. अग्निशमन दलाच्या जवानांनी येथील आग अटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. धुराचे लोट निर्माण झाल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना येथील आग विझविण्यासाठी अडचणी येत होत्या.

गणपतीवर पर्जन्यवृष्टी; राज्यात सोमवारपासून पावसाचा जोर वाढणार

चाकरमानी चल्ले गावाक! रेल्वे, एसटी, आराम बस, खासगी गाड्या निघाल्या

मराठा आरक्षण : मनोज जरांगे-पाटील यांना सरकारचे चर्चेचे आवाहन

SRA बिल्डरांसाठी काम करते! मुंबई उच्च न्यायालयाने प्राधिकरणाला फटकारले

महाराष्ट्र, केरळच्या सरकारी कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतन मिळणार