(प्रातिनिधिक छायाचित्र)
नवी मुंबई

सीबीडीतील वेलनेस स्पावर छापा; ४ महिलांसह पाच जण ताब्यात

मसाज पार्लरच्या नावाखाली ग्राहकांसोबत अश्लील चाळे करून अनैतिक धंदे करणाऱ्या सीबीडीतील वेलनेस स्पावर सीबीडी पोलिसांनी...

Swapnil S

नवी मुंबई : मसाज पार्लरच्या नावाखाली ग्राहकांसोबत अश्लील चाळे करून अनैतिक धंदे करणाऱ्या सीबीडीतील वेलनेस स्पावर सीबीडी पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी छापा मारून सदर मसाज पार्लरमध्ये अनैतिक धंदे करणाऱ्या चार महिलांसह पाच जणांना ताब्यात घेण्याची कारवाई करण्यात आली आहे.

सीबीडी सेक्टर-१५ मधील थापर कॉम्प्लेक्समधील वेलनेस स्पामध्ये काम करणाऱ्या महिलांकडून मसाजच्या नावाखाली ग्राहकांसोबत अश्लील चाळे करण्यात येत असल्याची माहिती परिमंडळ-१ चे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांना माहिती मिळाली होती. त्यानुसार वेलनेस स्पामध्ये बनावट ग्राहक पाठवून खात्री करण्यात आली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पराग लोंडे व त्यांच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी सीबीडी सेक्टर-१५ मधील थापर कॉम्प्लेक्समध्ये सुरू असलेल्या वेलनेस स्पावर छापा मारण्यात आला. तसेच मसाजच्या नावाखाली ग्राहकांसोबत अश्लील चाळे करणाऱ्या चार महिलांना तसेच या स्पाचा मॅनेजर अशा एकूण पाच जणांना ताब्यात घेण्यात आले. संबंधितांविरुद्ध सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समुद्रातील मासेमारीला लहान बोटी मुकणार; शासनाच्या निर्णयाला मच्छीमार कृती समितीचा विरोध

कामगारांच्या कामाचे तास वाढणार नाहीत; कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडून स्पष्टीकरण

मुंबईत घुसले १४ दहशतवादी, ३४ वाहनांमध्ये मानवी बॉम्बस्फोट घडवणार; अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना धमकी

Mumbai : लालबागच्या राजाचे अंतिम दर्शन घ्यायचे आहे? मग 'या' मार्गावर द्या बाप्पाला शेवटचा निरोप!

“शशी थरूर यांना स्पर्धक मिळाला”; पंजाबच्या महापुराबाबत पठ्ठ्याचं तोडकं-मोडकं इंग्रजी ऐकून नेटकरी लोटपोट, Video व्हायरल