(Photo - FPJ) 
नवी मुंबई

नवी मुंबई : खारघर टेकडीवर बिबट्याचा वावर; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण, सुरक्षेसाठी ठोस उपाययोजनांची मागणी

खारघर टेकडीवरील चाफेवाडी पाडा परिसरात बिबट्या दिसल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने तातडीने गस्त वाढवून बिबट्याला बंदिस्त करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.

Swapnil S

नवी मुंबई : खारघर टेकडीवरील चाफेवाडी पाडा परिसरात बिबट्या दिसल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने तातडीने गस्त वाढवून बिबट्याला बंदिस्त करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.

खारघर डोंगरावर मागील काही वर्षांत वनविभागाकडून मोठ्या प्रमाणात रोपलागवड करण्यात आली आहे. बांधकामाचा आवाज, नैसर्गिक अधिवास घटल्याने बिबट्या, कोल्हा यांसारखे वन्यजीव टेकडीच्या जंगलात आश्रय घेत असल्याची चर्चा परिसरात आहे.

सुमारे चार महिन्यांपूर्वी चाफेवाडीकडून फणसवाडीकडे जाणारा रस्ता ओलांडताना बिबट्या दिसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली होती. यानंतर पाणथळ जागी सीसीटीव्ही बसवणे व पावलांचे ठसे शोधण्याची मोहीम राबविण्यात आली; मात्र काहीही हाती लागले नव्हते. १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता चाफेवाडी पाडा लगत पुन्हा बिबट्या दिसल्याचा दावा ग्रामस्थांनी केला. त्यामुळे चाफेवाडी व फणसवाडी परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

खारघर डोंगरावर बिबट्या असल्याच्या तक्रारींनंतर चार महिन्यांपूर्वी गस्त घालण्यात आली होती, परंतु कोणतेही ठसे मिळाले नव्हते. आता पुन्हा तक्रारी येत असल्याने पाड्यात पाहणी करून योग्य ती उपाययोजना करण्यात येईल. - गजानन पांनपट्टे, वन परिक्षेत्र अधिकारी, पनवेल वन विभाग

मालेगावात जनआक्रोश! चिमुकलीच्या न्यायासाठी मालेगावकर एकवटले; न्यायालयासमोर ठिय्या आंदोलन

मीरा-भाईंदरकरांसाठी 'गुड न्यूज'! दहिसर-काशिमीरा मेट्रो 'या' महिन्यापासून सेवेत; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली घोषणा

कांदिवली गोळीबार प्रकरण: बिल्डरवर गोळ्या झाडणाऱ्या मुख्य सूत्रधाराला अटक; CCTV फुटेज समोर, ३ हल्लेखोरांचा शोध सुरू

उल्हासनगर राज्यातील राजकारणाचे नवे ‘हॉटस्पॉट’; भाजप-शिंदे संघर्षाची सुरुवात उल्हासनगरातूनच - फडणवीस

Mumbai : मुंबईकरांना दिलासा! ‘क्लस्टर’अंतर्गत नव्या इमारतीतील घरांसाठी नोंदणी शुल्क माफ; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय