'खरे भाजपचे आहात का ? आधी डीएनए टेस्ट करा!' आमदार मंदा म्हात्रे यांचा गणेश नाईक यांचे नाव न घेता निशाणा 
नवी मुंबई

'खरे भाजपचे आहात का ? आधी डीएनए टेस्ट करा!' आमदार मंदा म्हात्रे यांचा गणेश नाईक यांचे नाव न घेता निशाणा

भाजपशी प्रामाणिक नसलेल्या आणि पक्षाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्यांनी आधी आपली डीएनए टेस्ट करून घ्यावी. ते खरे भाजपचे आहेत का, हे तपासावे, अशा शब्दांत बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला.

Swapnil S

नवी मुंबई : भाजपशी प्रामाणिक नसलेल्या आणि पक्षाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्यांनी आधी आपली डीएनए टेस्ट करून घ्यावी. ते खरे भाजपचे आहेत का, हे तपासावे, अशा शब्दांत बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. वाशी येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी केलेल्या आक्रमक वक्तव्यामुळे नवी मुंबईतील भाजपमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघड झाले आहेत.

पत्रकार परिषदेत बोलताना म्हात्रे यांनी स्वपक्षातील विरोधकांवर जोरदार टीका केली. महापालिका नेमकी कोणाच्या दबावाखाली चालत आहे, असा सवाल उपस्थित करत प्रत्येकाने आपापली जबाबदारी पार पाडावी, असे त्यांनी सुनावले. कोणत्याही नेत्याच्या किंवा वरिष्ठांच्या मेहेरबानीवर नव्हे, तर जनतेच्या विश्वासावर आपण सलग तीन वेळा विधानसभेत निवडून आल्याचे सांगत त्यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली.

नवी मुंबई महापालिकेच्या कारभारावरही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. महापालिका केवळ फोटो काढण्यासाठी आणि सोशल मीडियावर रिल्स बनवण्यासाठी नसून सर्वसामान्य नागरिकांची कामे करण्यासाठी आहे, अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. बेलापूर विधानसभा मतदारसंघातील विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात आमदार निधी आणला आहे.

विकास प्रकल्पांवरही भाष्य

यावेळी म्हात्रे यांनी बेलापूरमधील प्रस्तावित सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज, बेलापूर मरीना प्रकल्प, सानपाडा येथील मध्यवर्ती ग्रंथालय आणि दिवाळे स्मार्ट सिटीअंतर्गत सुरू असलेल्या कामांबाबतही भूमिका मांडली. एकीकडे स्वपक्षातील नेत्यांना डीएनए टेस्टचे आव्हान, तर दुसरीकडे महापालिका प्रशासनावर दबावाचे आरोप, अशा दुहेरी आघाडीवरून आमदार म्हात्रे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai CNG Price Hike: आता सीएनजीही महाग; किलोमागे १.५० वाढ, नवा दर ९१.५० रुपये

नवा शैक्षणिक वादंग; खासगी विद्यापीठे, स्वायत्त महाविद्यालये शुल्क नियामक प्राधिकरणाच्या कक्षेत? विरोधकांचा आक्षेप, सत्ताधारीही अस्वस्थ

१४ कोटी मतदार अवैध, मग निवडणुका कशा वैध? राहुल गांधी यांचा सवाल

IND vs NZ 5th ODI: भारताच्या फलंदाजांचा कस; न्यूझीलंडविरुद्ध आज निर्णायक पाचवा एकदिवसीय सामना

'रामलीला'वरून माजणार रण; दिल्ली पोलिसांचा निर्बंधांचा प्रस्ताव, ५० हजार लोकांची मर्यादा