नवी मुंबई

माथेरानच्या ‘शार्लोट लेक’मध्ये नवी मुंबईचे ३ तरुण बुडाले

सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी माथेरान येथे आलेल्या नवी मुंबईच्या काही युवकांच्या सहलीची रविवारी दु:खद अखेर झाली. ‘

Swapnil S

माथेरान : सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी माथेरान येथे आलेल्या नवी मुंबईच्या काही युवकांच्या सहलीची रविवारी दु:खद अखेर झाली. ‘शार्लोट लेक’ परिसरात पोहण्याच्या व सेल्फी घेण्याच्या नादात तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली.

हे तरुण नवी मुंबईतील कोपरखैरणे परिसरातील राहणारे असल्याचे समजते. सुमित चव्हाण (१६, कोपरखैरणे), आर्यन खोब्रागडे (१९, नवी मुंबई), फिरोज शेख (१९, नवी मुंबई) अशी मृत तरुणांची नावे आहेत. या मृत तरुणांसह एकूण १० जणांचा ग्रुप माथेरान फिरायला आला होता.

दुपारी ते शार्लोट लेक परिसरात गेले असताना काही जण पाण्याच्या खूप जवळ गेले. यावेळी अचानक पाय घसरल्याने तिघेही खोल पाण्यात पडले. इतर मित्रांनी आरडाओरड करत मदत मागितली, पण तलाव खोल असल्यामुळे त्यांना बाहेर काढता आले नाही. स्थानिक प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन पथकाने शोधमोहीम सुरू केली. मात्र, सायंकाळपर्यंत तीनही तरुणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले नव्हते.

अमेरिकेचा भारताला तडाखा; भारतीय ‌वस्तूंवर १ ऑगस्टपासून २५ टक्के ‘टॅरिफ’

‘निसार’ उपग्रहाचे इस्रोकडून यशस्वी प्रक्षेपण; घनदाट जंगल व अंधारातही छायाचित्र टिपण्याची क्षमता

मालेगाव बॉम्बस्फोटाचा आज निकाल

२०११ पर्यंतच्या झोपडीधारकांना लॉटरी! मिळणार ५०० चौरस फुटांचे घर; शासकीय भूखंडावरील अतिक्रमणधारकांना राज्य सरकारचा दिलासा

काश्मीरमध्ये चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा