प्रातिनिधिक छायाचित्र
नवी मुंबई

मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली; जुईनगर-नेरूळ रेल्वे रुळावर लोखंडी रुळाचा तुकडा

नवी मुंबई : अज्ञात व्यक्तीने गत शनिवारी सकाळी ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरील जुईनगर-नेरूळ दरम्यानच्या रुळावर ४ फूट लोखंडी रेल्वे रुळाचा तुकडा टाकून लोकलमधील प्रवाशांचा जीव धोक्यात घालण्याचा प्रयत्न केला होता. सुदैवाने लोकलच्या मोटरमनला रेल्वे रुळावर पडलेला लोखंडी रुळाचा तुकडा निदर्शनास आल्याने मोटरमनने प्रसंगावधान दाखवत लोकल थांबवली होती.

Swapnil S

नवी मुंबई : अज्ञात व्यक्तीने गत शनिवारी सकाळी ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरील जुईनगर-नेरूळ दरम्यानच्या रुळावर ४ फूट लोखंडी रेल्वे रुळाचा तुकडा टाकून लोकलमधील प्रवाशांचा जीव धोक्यात घालण्याचा प्रयत्न केला होता. सुदैवाने लोकलच्या मोटरमनला रेल्वे रुळावर पडलेला लोखंडी रुळाचा तुकडा निदर्शनास आल्याने मोटरमनने प्रसंगावधान दाखवत लोकल थांबवली होती. मोटरमनला रुळावर पडलेला लोखंडी तुकडा निदर्शनास आला नसता, तर मोठी दुर्घटना घडली असती, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. वाशी रेल्वे पोलिसांनी रेल्वे रुळावर लोखंडी रेल्वे रुळाचा तुकडा टाकणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

जुईनगर आणि नेरूळ या दरम्यानच्या रेल्वे रुळावर गत शनिवारी एका अज्ञात व्यक्तीने रेल्वे रुळाचा अंदाजे ४ फूट लांबीचा लोखंडी तुकडा ट्रान्स हार्बर डाऊन मार्गावरील रेल्वे रुळावर टाकून पलायन केले होते. हा प्रकार ठाणे येथून नेरूळ येथे लोकल घेऊन येत असलेल्या मोटरमनच्या लक्षात आल्याने मोटरमनने प्रसंगावधान दाखवून अचानक ब्रेक मारून तत्काळ लोकल थांबवण्याचा प्रयत्न केला होता.

रेल्वे पोलिसांनी लोकलचे मोटरमन शशीकुमार यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. ठाणे-नेरूळ या मार्गावरील मोटरमनला रुळावर पडलेला लोखंडी तुकडा निदर्शनास आला नसता, तसेच वेगात असलेल्या लोकलची त्याला धडक लागली असती तर मोठी दुर्घटना घडली असती, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. मात्र मोटरमनने प्रसंगावधान दाखवल्यामुळे लोकलची मोठी दुर्घटना टळल्याचे बोलले जात आहे.

प्रवाशांचे हाल

लोखंडी रेल्वे रुळाच्या तुकड्याला लोकलची धडक बसून लोकल गाडीचा कॅटील गार्ड वाकून त्याला तडा गेला होता. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव लोकल त्याच ठिकाणी थांबवण्यात आल्याने सदर लोकलमधील प्रवाशांना लोकलमधून पायी चालत नेरूळ रेल्वे स्थानक गाठावे लागले होते. या प्रकारामुळे ऐन सकाळच्या वेळी ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली होती.

GST आता फक्त ५ आणि १८ टक्के; नवीन दराचा ‘घट’ २२ सप्टेंबरपासून

शिखर धवनला ED कडून समन्स; दोषी आढळल्यास माजी क्रिकेटपटूवर काय कारवाई होणार?

मराठा आरक्षणाच्या जीआरवरून OBC नेत्यांमध्ये मतमतांतरे; जीआर प्रत फाडत लक्ष्मण हाके यांचे आंदोलन; भुजबळांचा कोर्टात जाण्याचा इशारा

मुंबईची वाढती तहान भागवायला आणखी दोन धरणांचा प्रस्ताव

सुप्रीम कोर्टाची राज्य सरकारला नोटीस; कॉ. पानसरे यांच्या कुटुंबीयांच्या याचिकेवर निर्देश