नवी मुंबई

दहावीच्या विद्यार्थ्याचा अपघातात मृत्यू

तुर्भे येथे राहणारा एक दहावीचा विद्यार्थी हॉल तिकीटचे प्रिंट आऊट आणण्यासाठी गेला असता त्याचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना तुर्भे नाक्यावर घडली आहे.

Swapnil S

नवी मुंबई : तुर्भे येथे राहणारा एक दहावीचा विद्यार्थी हॉल तिकीटचे प्रिंट आऊट आणण्यासाठी गेला असता त्याचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना तुर्भे नाक्यावर घडली आहे. सायकलवरून जात असताना पाठीमागून येणाऱ्या डम्परने त्याला जोरदार धडक दिली त्यातच त्याचा जीव गेला. याप्रकरणी डम्परचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

तुर्भे येथे राहणारा दीपांशु राजेश बौद्ध हा दहावीत शिकत असून काही दिवसांपूर्वी हॉल तिकीट वितरीत करण्यात आले. त्याच हॉल तिकीटची अजून एक झेरॉक्स प्रिंट काढण्यासाठी दीपांशु हा मित्र अल्ताफसोबत रस्त्यावरून जात असताना पाठीमागून येणाऱ्या डम्परने त्याला जोरदार धडक दिली.

Mumbai : ‘एआय’च्या मदतीने बनावट पासचे आणखी एक प्रकरण; तीन जणांवर गुन्हा दाखल, एसी लोकलमधून करत होते प्रवास

राज्यातील शिक्षकांना मिळणार सकारात्मक शिस्तीचे धडे; शिक्षण विभागाचे महत्त्वपूर्ण पाऊल

नवी मुंबई विमानतळावर प्रवासी चाचणी यशस्वी; २५ डिसेंबरपासून उड्डाणांना हिरवा कंदील

संसदेचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार; ‘एसआयआर’वरील चर्चेवर विरोधक ठाम

राज्यात २० जिल्ह्यांतील नगर परिषद निवडणुका पुढे ढकलल्या; नव्याने अर्ज दाखल करण्याची मुभा, सुधारित कार्यक्रमानुसार २० डिसेंबरला मतदान