नवी मुंबईतील ११ कचरावेचक महिला दहावी परीक्षेत उत्तीर्ण; ‘आता थांबायचं नाय!’ सिनेमाची प्रेरणा घेऊन यश संपादन 
नवी मुंबई

नवी मुंबईतील ११ कचरावेचक महिला दहावी परीक्षेत उत्तीर्ण; ‘आता थांबायचं नाय!’ सिनेमाची प्रेरणा घेऊन यश संपादन

‘आता थांबायचं नाय’ या प्रेरणादायी चित्रपटातून प्रेरणा घेत नवी मुंबईतील ११ कचरावेचक महिलांनी दहावी बोर्ड परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली आहे.

Swapnil S

नवी मुंबई : ‘आता थांबायचं नाय’ या प्रेरणादायी चित्रपटातून प्रेरणा घेत नवी मुंबईतील ११ कचरावेचक महिलांनी दहावी बोर्ड परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली आहे. या सर्व महिलांच्या यशामुळे सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

‘आता थांबायचं नाय’ या चित्रपटात कचरावेचक महिलांच्या शिक्षण प्रवासाची कहाणी पाहून प्रेरित झालेल्या या महिलांनी दहावीची परीक्षा देण्याचा निर्धार केला होता. हा निर्धार आता यशात परिवर्तित झाला आहे. आनंदी कांबळे, प्रतीक्षा कीरतकुढवे, चंदा पटेकर, सोनाली कांबळे, मंगल कांबळे, सुनंदा पाठनुरे, अक्षदा गायकवाड, हेमा कांबळे, मुक्ता राठोड, रमा बगाडे यांनी मेहनतीच्या बळावर आपली दहावी पूर्ण केली. प्रभात ट्रस्टचे डॉ. प्रशांत थोरात यांनी सांगितले की, या महिलांचा पुढील शिक्षणासाठीही आम्ही पूर्ण पाठिंबा देणार आहोत. स्त्रीमुक्ती संघटनाच्या वृषाली मगदूम यांनी सांगितले की, चित्रपटातून प्रेरणा घेतली असली तरी प्रत्यक्ष प्रवास खूप कठीण होता. कागदपत्रांची पूर्तता, अभ्यास आणि काम यांचा समतोल साधणे हे मोठे आव्हान होते. हे यश पूर्णपणे सामूहिक प्रयत्नांचे फळ आहे.

शिक्षणासाठी संघर्षमय प्रवास

स्त्रीमुक्ती संघटना आणि प्रभात ट्रस्ट यांच्या संयुक्त प्रयत्नातून या ११ महिलांनी परीक्षा दिली. या सर्व महिलांचा शिक्षणात तब्बल १५ ते २० वर्षांचा मोठा गॅप होता. अनेकांकडे शाळा सोडल्याचे दाखले व आवश्यक कागदपत्रेही नव्हती. मात्र सर्व अडचणींवर मात करत त्यांनी परीक्षा फॉर्म भरून अभ्यास सुरू केला. अभ्यास, घरकाम आणि नोकरी या तिन्ही जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी कठोर परिश्रम घेतले.

अभ्यासासाठी विशेष मार्गदर्शन

दर रविवारी घणसोली येथील प्रभात ट्रस्टच्या कार्यालयात गाडेकर सर, गालवे सर, खताळ सर आणि इतर शिक्षकांनी त्यांना मार्गदर्शन केले. आशा गायकवाड यांनी समन्वयकाची भूमिका बजावली. शेवटच्या दोन महिन्यांत या महिलांना पगारी रजा देऊन सकाळी ११ ते संध्याकाळी ६ या वेळेत विशेष अभ्यासवर्ग घेण्यात आले.

सामाजिक अडथळ्यांवर मात

काही महिलांना कुटुंबातील विरोध, अभ्यासासाठी वेळ न देणे, तसेच सामाजिक अडथळ्यांचा सामना करावा लागला. मात्र त्यांनी हार न मानता सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले. एका महिलेच्या पतीने निकाल लागल्यानंतर संपूर्ण चाळीत पेढे वाटून तर काहींनी घरी केक कापून आनंद व्यक्त केला.

Jharkhand Student Protest : भरती परीक्षांविरोधातील आंदोलन तीव्र; पोलिसांना धक्काबुक्की, ABVP चे ११० कार्यकर्ते ताब्यात

Mumbai-Pune Expressway : 'मिसिंग लिंक' उद्या ३ तास बंद; प्रवासाला निघण्यापूर्वी वाचा महत्त्वाची बातमी

IPL क्रिकेटपटू अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचाराचा आरोप

Government Holiday : मुंबईकरांना दहीहंडीऐवजी रक्षाबंधनला सुट्टी; ऑगस्टअखेरीस मिळणार सलग ३ दिवसांचा ब्रेक

Mumbai : 'लोकलमधील ३ डबे विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवा'; Gen Z, Gen Alpha साठी तेजस्वी घोसाळकरांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी