Navi Mumbai : ‘त्या’ कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीला १५ दिवसांची ‘मुदत’ (संग्रहित छायाचित्र)
नवी मुंबई

Navi Mumbai : ‘त्या’ कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीला १५ दिवसांची ‘मुदत’

नवी मुंबई महापालिकेतील ८,०९९ कंत्राटी कर्मचाऱ्यांना नागरी सेवा संचालन विशेष भत्त्यांतर्गत मंजूर झालेली ७,५०० रुपयांची पगारवाढ लागू करण्यासाठी प्रशासनाला १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

Swapnil S

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेतील ८,०९९ कंत्राटी कर्मचाऱ्यांना नागरी सेवा संचालन विशेष भत्त्यांतर्गत मंजूर झालेली ७,५०० रुपयांची पगारवाढ लागू करण्यासाठी प्रशासनाला १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. पगारवाढीचा निर्णय होऊनही त्याची अंमलबजावणी रखडल्याने शुक्रवारी झालेल्या तहकूब महासभेत सभागृह नेते सागर नाईक यांनी प्रशासनाला जाब विचारला. यावेळी महापौर सुजाता पाटील यांनी १५ दिवसांत पगारवाढ लागू करण्याचे आदेश प्रशासनाला दिल्याचे स्पष्ट केले.

गत जूनमध्ये झालेल्या सर्वसाधारण सभेत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगारात विशेष भत्त्यांतर्गत ७,५०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, प्रशासकीय प्रक्रिया आणि ऑडिटच्या तांत्रिक कारणांमुळे त्याची अंमलबजावणी झालेली नव्हती. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी होती. महापालिका प्रशासन किमान वेतनापेक्षा अधिक वेतन देण्यास सक्षम असून, त्यासाठी आवश्यक निधीही उपलब्ध असल्याचे सागर नाईक यांनी सांगितले.

केवळ प्रशासकीय आणि ऑडिटच्या कारणांमुळे मंजूर पगारवाढ रोखणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. येत्या १५ दिवसांत पगारवाढ लागू करून कर्मचाऱ्यांचा सण गोड करावा, अशी मागणी त्यांनी केली. विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनीही पगारवाढ तातडीने लागू करण्याची मागणी केली.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : रविवार ठरला घातवार! विविध अपघातांमध्ये ५ जण ठार, ९ जखमी

अडवाणी, सिसोदियांना नोटीस; मतदारयादी तपासणीमध्ये पूर्वीच्या यादीशी मेळ न जुळल्याने कारवाई

Maharashtra TET Paper Leak : दोन फरार आरोपींना अटक

Mumbai : आयआयटी प्राध्यापक मंचाचा दुल्ला यांना पाठिंबा

Mira-Bhayandar : मेट्रो ब्रिजचा ब्लॉक कोसळून तरुण जखमी