नवी मुंबई एअरपोर्टसाठी नवे इमिग्रेशन चेकपोस्ट; २८५ नवीन पोलीस पदांना मंजुरी, प्रतिनियुक्तीवर इच्छुक कर्मचाऱ्यांचे मागवले अर्ज 
नवी मुंबई

नवी मुंबई एअरपोर्टसाठी नवे इमिग्रेशन चेकपोस्ट; २८५ नवीन पोलीस पदांना मंजुरी, प्रतिनियुक्तीवर इच्छुक कर्मचाऱ्यांचे मागवले अर्ज

एकूण २८५ नवीन पोलीस पदांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये २० पोलीस निरीक्षक, ५५ पोलीस उपनिरीक्षक, ३० सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, ६० पोलीस हवालदार आणि १२० पोलीस शिपाई यांचा समावेश आहे.

Krantee V. Kale

नवी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ८ ऑक्टोबर रोजी अर्थात आज उद्घाटन होणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी प्रशासन आपापल्या विभागांची तयारी वेगाने करत आहे. या विमानतळावर आंतरराष्ट्रीय विमानांची वाहतूक लवकरच सुरू होणार असल्याने, इमिग्रेशन विभागासाठी अत्यावश्यक पोलीस मनुष्यबळ उपलब्ध करणे गरजेचे ठरले आहे.

यासाठी एकूण २८५ नवीन पोलीस पदांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये २० पोलीस निरीक्षक, ५५ पोलीस उपनिरीक्षक, ३० सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, ६० पोलीस हवालदार आणि १२० पोलीस शिपाई यांचा समावेश आहे. या नवीन पदांसाठी १० कोटी २० लाख ८८ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय आणि पोलीस महासंचालक कार्यालयाद्वारे या पदांसाठी प्रतिनियुक्तीवर इच्छुक पोलीस कर्मचाऱ्यांचे अर्ज मागवण्यात आले आहेत. तसेच, आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सुरक्षेसाठी पोलीस मनुष्यबळाचे प्रशिक्षण अगोदर देऊन, आवश्यक प्रक्रियांसह व्हिसा, पारपत्र तपासणी आणि इतर सुरक्षा अनुशंघानाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. विमानतळ उघडल्यानंतर दरवर्षी अंदाजे ९ कोटी प्रवासी आणि ३६० दशलक्ष मेट्रिक टन मालवाहतूक या विमानतळाद्वारे हाताळली जाणार आहे. त्यामुळे योग्य मनुष्यबळाची व्यवस्था करणे अत्यंत आवश्यक ठरले आहे.

नवीन नियुक्ती होणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना विमानतळावरील महत्त्वाच्या प्रक्रिया शिकवल्या जातील. तोपर्यंत प्रतिनियुक्तीवर २८५ पोलीस तात्काळ धर्तीवर कार्यरत राहतील.याशिवाय, वाहतूक विभागासाठी १७७ पदांची निर्मिती शासनस्तरावर अंतिम टप्प्यात असून, मंजुरी मिळताच या पदांनाही भरती प्रक्रिया सुरू केली जाईल. या तयारीमुळे नवी मुंबई विमानतळावरील सुरक्षा व व्यवस्थापनासाठी सक्षम पोलीस यंत्रणा तत्पर राहणार आहे.
संजयकुमार पाटील, पोलीस उपायुक्त मुख्यालय

Shiv Sena Symbol Dispute: सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा लांबणीवर; आता १२ नोव्हेंबरला फैसला?

नवी मुंबई विमानतळाचे आज PM नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन; भारताच्या पहिल्या ‘पूर्ण डिजिटल’ एअरपोर्टची १० वैशिष्ट्ये

कन्फर्म तिकीट पण प्लॅन बदलला? टेन्शन नको! आता ‘डेट चेंज’ची मोफत सोय; रेल्वेचा नवा नियम

UPI वापरकर्त्यांना 'पिन'ऐवजी चेहरा, बोटाचा ठसा सक्तीचा; NPCI ची मंजुरी; आजपासून बायोमेट्रिक प्रणाली सुरू होणार

तीन अमेरिकन शास्त्रज्ञांना भौतिकशास्त्राचे नोबेल; क्वांटम टनेलिंगवरील शोधाबद्दल पुरस्कार