नवी मुंबई

नवी मुंबई विमानतळावरून इंडिगो कंपनी देणार विमानसेवा; मोदींच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी उद्घाटन?

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान, या पहिल्या टप्प्यात व्यावसायिक उड्डाणे सुरू करणारी इंडिगो ही पहिली एअरलाईन कंपनी असेल, असे एअरलाइन आणि अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेड (एएएचएल) यांनी बुधवारी संयुक्त निवेदनात सांगितले.

Swapnil S

मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान, या पहिल्या टप्प्यात व्यावसायिक उड्डाणे सुरू करणारी इंडिगो ही पहिली एअरलाईन कंपनी असेल, असे एअरलाइन आणि अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेड (एएएचएल) यांनी बुधवारी संयुक्त निवेदनात सांगितले.

इंडिगोची यशस्वी लँडिंग

११ ऑक्टोबर २०२४ रोजी नवी मुंबई विमानतळावर भारतीय हवाई दलातर्फे ११ ऑक्टोबर २०२४ रोजी इन्स्ट्रूमेन्ट लॅंडिंगची चाचणी आणि २९ डिसेंबरला इंडिगोतर्फे प्रवासी विमानाची यशस्वी लॅंडिंग चाचणी धावपट्टीवर पार पडली होती. यापूर्वी सोमवारी २४ फेब्रुवारी नागरी विमान वाहतूक महासंचलनालय आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण दिवस विमानतळाची पाहणी केली होती.

महत्त्वाचा टप्पा

इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स म्हणाले, इंडिगो ही एनएमआयएवरून काम करणारी पहिली एअरलाइन असेल. हा विस्तार प्रवाशांच्या वाढत्या गरजा आणि भारताच्या विमान वाहतूक क्षेत्राच्या वाढीप्रती आम्ही कटिबद्ध आहोत. एएएचएलचे सीईओ अरुण बन्सल पुढे म्हणाले, इंडिगोसोबतची आमची भागीदारी एनएमआयएला एक प्रमुख विमान वाहतूक केंद्र बनवण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा आहे.

१४० दैनिक उड्डाणे

इंडिगो पहिल्या दिवसापासून १५ हून अधिक भारतीय शहरांमध्ये दररोज १८ उड्डाणे (३६ हवाई वाहतूक हालचाली) चालवेल. नोव्हेंबर २०२५ पर्यंत १४ आंतरराष्ट्रीय उड्डाणांसह ७९ दैनिक उड्डाणे आणि नोव्हेंबर २०२६ पर्यंत ३० आंतरराष्ट्रीय उड्डाणांसह १४० दैनिक उड्डाणे करण्याची कंपनीची योजना आहे.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत