नवी मुंबई

पदवी नसताना वैद्यकीय व्यवसाय; महापालिकेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

इलेक्ट्रोहोमीओपॅथीची पदवी धारण केलेल्या व्यक्तीने स्वत:च्या नावासमोर डॉक्टर पदवी लावून गोरगरीब रुग्णांवर ऍलोपॅथीचे उपचार केल्याची बाब महापालिका आरोग्य विभागाच्या निदर्शनास आली आहे.

Swapnil S

नवी मुंबई : इलेक्ट्रोहोमीओपॅथीची पदवी धारण केलेल्या व्यक्तीने स्वत:च्या नावासमोर डॉक्टर पदवी लावून गोरगरीब रुग्णांवर ऍलोपॅथीचे उपचार केल्याची बाब महापालिका आरोग्य विभागाच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे बेकायदेशीररीत्या वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या या इलेक्ट्रो होमीओपॅथिक व्यक्तीच्या विरोधात नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने तक्रार दाखल करताच रबाळे एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले.

दगडू साहेबराव ठाकरे (५५) असे या इलेक्ट्रोहोमीओपॅथिक व्यक्तीचे नाव असून, गेल्या काही महिन्यांपासून त्याने रबाळे एमआयडीसीतील कातकरी पाडा भागात क्लिनिक उघडून बेकायदेशीररीत्या वैद्यकीय व्यवसाय सुरू केला होता. या व्यक्तीच्या विरोधात महापालिकेकडे यासंदर्भात तक्रार प्राप्त झाली होती.

सदर तक्रारीच्या अनुषंगाने महापालिकेच्या आरोग्य विभागाने रबाले कातकरी पाडा भागात वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या दगडू ठाकरे याच्या क्लिनिकमध्ये जाऊन तपासणी केली असता, दगडू ठाकरे याच्याकडे इलेक्ट्रोहोमीओपॅथीची पदवी असल्याचे आढळून आले. तसेच संबंधित व्यक्तीला ॲलोपॅथीचे उपचार करण्याची परवानगी नसताना ती व्यक्ती रुग्णांना ॲलोपॅथीचे औषधे देऊन उपचार करत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण कटके यांनी रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात सदर व्यक्ती विरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी दगडू साहेबराव ठाकरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले. संबंधित गुन्हा सात वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या शिक्षेतर्गत मोडत असल्याने पोलिसांनी त्याला नोटीस देऊन सोडून दिले आहे.

एकत्र आणणं माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल

''जर इथे येऊन धंदा करताय तर मराठी बोलायची लाज कसली?'' अभिनेते भरत जाधव यांचा संतप्त सवाल

गुजरातेत हिंदी सक्ती नसेल, तर ती महाराष्ट्रात कशासाठी? खासदार सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल

‘जय गुजरात’मुळे वादंग; अमित शहांपुढे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या घोषणेमुळे विरोधक संतप्त

हायकोर्टाची सुनावणी सोमवारपासून लाईव्ह; सुरुवातीला पाच न्यायमूर्तींचा समावेश