नवी मुंबई

Navi Mumbai: गुगल मॅपने भरकटलेली कार थेट खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिला बचावली

गुगल मॅप लावून गाडी चालवताना अंदाज चुकला आणि कार थेट खाडीत पडल्याची घटना शुक्रवारी रात्री एकच्या सुमारास नवी मुंबईतील बेलापूर खाडीत घडली. सुदैवाने सागरी सुरक्षारक्षक दल वेळीच घटनास्थळी पोहोचल्याने महिलेस वाचवण्यात यश आले.

Swapnil S

नवी मुंबई : गुगल मॅप लावून गाडी चालवताना अंदाज चुकला आणि कार थेट खाडीत पडल्याची घटना शुक्रवारी रात्री एकच्या सुमारास नवी मुंबईतील बेलापूर खाडीत घडली. सुदैवाने सागरी सुरक्षारक्षक दल वेळीच घटनास्थळी पोहोचल्याने महिलेस वाचवण्यात यश आले. दरम्यान, सकाळी क्रेनच्या मदतीने खाडीतून गाडी बाहेर काढण्यात आली आहे.

शुक्रवारी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास संबंधित महिला कारने उलवेच्या दिशेने जात होती. गुगल मॅपवर सरळ रस्ता दाखवला गेल्याने तिने पुलावरून न जाता, खालील पर्यायी मार्ग निवडला. मात्र, तो मार्ग थेट ध्रुवतारा जेट्टीकडे जात असल्याने तिची कार अनपेक्षितपणे थेट खाडीत कोसळली.

जवळच गस्त घालणाऱ्या सागरी सुरक्षा पोलिसांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी तत्काळ बोटीच्या सहाय्याने घटनास्थळी धाव घेतली आणि पाण्यात वाहत असलेल्या महिलेचा जीव वाचवला. ही घटना थेट सागरी पोलीस चौकीसमोरच घडल्याने वेळेवर मदत पोहोचली आणि अनर्थ टळला.

कमी पाण्याची पिके घ्या; शेती खात्याचे शेतकऱ्यांना आवाहन

आसाममधील चहाच्या मळ्याचा ‘टी टुरिझम’वर भर; ग्राहकांना चहाच्या संस्कृतीशी पुन्हा जोडण्याचा प्रयत्न

‘गृह’ अन् ‘महसूल’ खाते कोणाकडे हे माहिती आहे का? परिवहन मंत्री सरनाईक यांचा आमदार मेहतांना टोला

मुंबईत गंभीर गुन्हेगारीत वाढ; गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा खुनाच्या गुन्ह्यांमध्येही मोठी वाढ

Navi Mumbai : एनआरआय फ्लेमिंगो तलावावर पर्यटकांची झुंबड; DPS, TSC वेटलँड्स पुनर्जीवित करा, पर्यावरणवाद्यांची राज्य सरकारकडे मागणी