मॉर्निंग वॉकदरम्यान चेन स्नॅचिंग; आरोपी अटकेत 
नवी मुंबई

Navi Mumbai : मॉर्निंग वॉकदरम्यान चेन स्नॅचिंग; आरोपी अटकेत

रबाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेची सोन्याची चेन जबरदस्तीने खेचून पळ काढणाऱ्या आरोपीस पोलिसांनी अटक करत गुन्ह्याचा यशस्वी छडा लावला आहे. ही घटना १४ मार्च रोजी सकाळी सुमारे ७.५० वाजण्याच्या सुमारास घणसोली परिसरात घडली.

Swapnil S

नवी मुंबई : रबाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेची सोन्याची चेन जबरदस्तीने खेचून पळ काढणाऱ्या आरोपीस पोलिसांनी अटक करत गुन्ह्याचा यशस्वी छडा लावला आहे. ही घटना १४ मार्च रोजी सकाळी सुमारे ७.५० वाजण्याच्या सुमारास घणसोली परिसरात घडली. फिर्यादी अनिता राजकुमार गुप्ता (५४) या आपल्या सोसायटीमध्ये स्कुटी पार्क करत असताना पाठीमागून आलेल्या अज्ञात इसमाने त्यांच्या गळ्यातील सुमारे २५ ग्रॅम वजनाची, अंदाजे १ लाख २५ हजार रुपये किमतीची सोन्याची चेन हिसकावून नेली.

या प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) संजय गवळी व त्यांच्या पथकाने घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली.

तांत्रिक विश्लेषण आणि बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढण्यात पोलिसांना यश आले.

पोलिसांनी अजिंक्य अनंत शिंदे (३६) याला अटक केली. चौकशीत त्याचा इतर गुन्ह्यांमध्येही सहभाग असल्याचे उघड झाले असून त्याच्यावर यापूर्वी पनवेल शहर व रसायनी पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे नोंद असल्याची माहिती समोर आली आहे. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक दीपक खरात व त्यांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली असून पुढील तपास सुरू आहे.

रस्त्याच्या कामावरून प्रश्न विचारताच तरुणाच्या लगावली कानशिलात; मंत्री प्रवेश वर्मांचा Video सोशल मीडियावर व्हायरल

NCMC Card : अजून कार्ड काढलं नाही? १ ऑक्टोबरपूर्वी करा नोंदणी; कुठे अन् कशी करायची? वाचा संपूर्ण प्रक्रिया

Video : आशुतोष रांकांसह CJP चे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; सुटका न झाल्यास आसामला जाणार, अभिजीत दिपकेंचा इशारा

Mumbai : अनंत चतुर्दशीला नाही तर अंगारकी संकष्टीला होते अंधेरीच्या राजाचे विसर्जन; जाणून घ्या खास परंपरा

LPU Students Protest : बलात्काराच्या अफवेने विद्यार्थ्यांचा उद्रेक; कॅम्पसमध्ये जाळपोळ, महामार्गही रोखला, Video