Navi Mumbai : साखळी चोरी करणाऱ्या टोळीवर ‘मोक्का’; रबाळे पोलिसांची कारवाई 
नवी मुंबई

Navi Mumbai : साखळी चोरी करणाऱ्या टोळीवर ‘मोक्का’; रबाळे पोलिसांची कारवाई

रबाळे पोलीस ठाणे हद्दीत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून जबरी चोरी करणाऱ्या संघटित गुन्हेगारी टोळीविरुद्ध रबाळे पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत कठोर कारवाई केली आहे.

Swapnil S

नवी मुंबई : रबाळे पोलीस ठाणे हद्दीत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून जबरी चोरी करणाऱ्या संघटित गुन्हेगारी टोळीविरुद्ध रबाळे पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत कठोर कारवाई केली आहे.

आयुष अर्जुन देटके, अर्जुन बाबू चव्हाण अपर्णा संदीप आवळे, तखतसिंग प्रेमसिंग राठोड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहे तर अविनाश सुनील शिशुपाल, अनिकेत सुनील शिशुपाल व मोहम्मद शाहबाज खान यांचा शोध सुरू आहे. यातील राठोड याचा गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग नसला तरी चोरीचे सोने आहे हे माहिती असूनही तो या टोळीने चोरी केलेले सोने विकत घेत होता तर अपर्णा ही सोने विकण्यास मदत करीत होती.

२४ मार्च रोजी पहाटे ऐरोली सेक्टर-२ येथे निर्मला शांताराम पवार यांच्या गळ्यातील ५ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत मोटारसायकलवर आलेल्या दोन अज्ञात इसमांनी चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने हिसकावून नेली होती. त्याच दिवशी तळवली येथील मनपा शाळेसमोर जेन्सीबाई हरिश्चंद्र नाडार यांच्या गळ्यातील ७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरी करण्यात आले. ऐरोली गावातील जोशी व्हिलासमोर यमुना बाळासाहेब भोईर यांच्या गळ्यातील अंदाजे २० ग्रॅम वजनाची सोन्याची जीरा माळ जबरीने चोरी झाली होती.

पोलीस उपनिरीक्षक राहुल गरड व त्यांच्या पथकाने अत्यंत कौशल्या तिन्ही गुन्हे उघडकीस आणले. आरोपींकडून चोरीस गेलेला अंदाजे १ लाख ५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. अविनाश सुनील शिशुपाल व त्याच्या साथीदारांविरुद्ध नवी मुंबई व मुंबई परिसरात एकूण १४ गंभीर गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.

रस्त्याच्या कामावरून प्रश्न विचारताच तरुणाच्या लगावली कानशिलात; मंत्री प्रवेश वर्मांचा Video सोशल मीडियावर व्हायरल

NCMC Card : अजून कार्ड काढलं नाही? १ ऑक्टोबरपूर्वी करा नोंदणी; कुठे अन् कशी करायची? वाचा संपूर्ण प्रक्रिया

Video : आशुतोष रांकांसह CJP चे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; सुटका न झाल्यास आसामला जाणार, अभिजीत दिपकेंचा इशारा

Mumbai : अनंत चतुर्दशीला नाही तर अंगारकी संकष्टीला होते अंधेरीच्या राजाचे विसर्जन; जाणून घ्या खास परंपरा

LPU Students Protest : बलात्काराच्या अफवेने विद्यार्थ्यांचा उद्रेक; कॅम्पसमध्ये जाळपोळ, महामार्गही रोखला, Video