'एआय'ने बनविलेली प्रतिमा
नवी मुंबई

Navi Mumbai : ‘छोटा पोलीस’ च्या रूपात मुलं ठेवणार पालकांच्या ड्रायव्हिंगवर नजर; वाहतूक शिस्तीसाठी पोलिसांचा अनोखा उपक्रम

'छोटा पोलीस आणि पालकांचा ट्रॅफिक रिपोर्ट कार्ड’ या उपक्रमाअंतर्गत शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी आपल्या पालकांनी वाहतूक नियम पाळले की नाही, याचे निरीक्षण करून त्यांना ग्रीन किंवा रेड रिमार्क देणार आहेत.

किशोरी घायवट-उबाळे

नवी मुंबई : रस्त्यावरील शिस्त सुधारण्यासाठी आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने नवी मुंबई पोलिसांनी एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमात पालकांच्या ड्राइव्हिंगवर थेट त्यांच्या मुलांचीच नजर असणार आहे.

'छोटा पोलीस आणि पालकांचा ट्रॅफिक रिपोर्ट कार्ड’ या उपक्रमाअंतर्गत शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी आपल्या पालकांनी वाहतूक नियम पाळले की नाही, याचे निरीक्षण करून त्यांना ग्रीन किंवा रेड रिमार्क देणार आहेत.

रस्ता सुरक्षा मोहिमेच्या समारोपात उपक्रमाचे अनावरण

हा उपक्रम सोमवारी (दि.२) वाशी येथे पार पडलेल्या रस्ता सुरक्षा मोहिमेच्या समारोप कार्यक्रमात सादर करण्यात आला. पोलिस अधिकाऱ्यांच्या मते, मुलांकडून मिळणारा संदेश हा दंडापेक्षा अधिक प्रभावी ठरतो.

वाहतूक उपायुक्त (DCP Traffic) तिरुपती काकडे म्हणाले, "एखाद्या पालकाला स्वतःच्या मुलाकडून रेड रिमार्क मिळाला, तर तो कोणत्याही दंडापेक्षा जास्त परिणामकारक ठरेल."

शाळेच्या प्रगतीपत्रकाच्या धर्तीवर ‘ट्रॅफिक रिपोर्ट कार्ड’

नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी शालेय प्रगतीपत्रकाच्या धर्तीवर 'ट्रॅफिक रिपोर्ट कार्ड' तयार केले आहे. या कार्डमध्ये एकूण ९ महत्त्वाचे वाहतूक नियम नमूद केले आहेत. यामध्ये दुचाकी चालवताना हेल्मेट वापरणे, सिग्नलचे पालन, सीट बेल्ट लावणे, वाहन चालवताना मोबाईलचा वापर टाळणे अशा गोष्टींचा समावेश आहे.

शाळा आणि महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना ‘छोटा पोलीस’ म्हणून नियुक्त करण्यात येणार असून, ठराविक कालावधीत ते आपल्या पालकांच्या ड्राइव्हिंगच्या सवयींचे निरीक्षण करतील.

ग्रीन-रेड रिमार्क; अहवाल शाळेमार्फत पोलिसांकडे

नियम पाळल्यास ग्रीन रिमार्क, तर उल्लंघन केल्यास रेड रिमार्क दिला जाईल. मूल्यांकन कालावधी संपल्यानंतर हे रिपोर्ट कार्ड शाळेमार्फत पोलिसांकडे सादर करण्यात येतील किंवा शाळेच्या परिसरात प्रदर्शित केले जाणार आहे.

पालकांमध्ये शिस्त, मुलांमध्ये संस्कार

नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सांगितले की, "हा उपक्रम केवळ पालकांमध्ये वाहतूक शिस्त वाढवणारा नाही, तर मुलांमध्ये लहान वयातच रस्ता सुरक्षेचे संस्कार रुजवणारा आहे. हेच विद्यार्थी भविष्यातील वाहनचालक आहेत."

हा उपक्रम आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या संकल्पनेतून साकार झाला असून, संयुक्त पोलीस आयुक्त संजय येनपुरे आणि उपायुक्त तिरुपती काकडे यांच्या नेतृत्वाखाली त्याचे नियोजन करण्यात आले आहे. लवकरच हा उपक्रम नवी मुंबईतील सर्व प्रमुख शाळांमध्ये राबवला जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

IAF AN-32 Aircraft Crash : लँडिंगदरम्यान अनर्थ! जोरहाटमध्ये भारतीय हवाई दलाचे विमान कोसळले, VIDEO समोर

... म्हणून तक्रार करत नाही; पारंपरिक समाजात लैंगिक गुन्ह्यांविरोधात कुटुंब कचरतात - न्यायालय

"प्लिज मला एक संधी द्या, चांगला माणूस बनून दाखवेन"; ३७० रुपयांच्या बिर्याणी वादावर प्रणित मोरेची जाहीर माफी, VIDEO

विद्यार्थ्यांना मिळणार ST चे डिजिटल ‘रुपे’ कार्ड; सवलतीच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ड योजना, विद्यार्थ्यांसाठी नोंदणी प्रक्रियेला गती

ठाण्यात अनधिकृत ३७ शाळांविरोधात गुन्हे दाखल; ५८ शाळांची यादी जाहीर, दिवा परिसरात सर्वाधिक शाळा