Navi Mumbai : सिडकोच्या वसाहती तहानलेल्याच; खारघर, कळंबोली, तळोजात पाणीटंचाईचे संकट  प्रातिनिधिक छायाचित्र
नवी मुंबई

Navi Mumbai : सिडकोच्या वसाहती तहानलेल्याच; खारघर, कळंबोली, तळोजात पाणीटंचाईचे संकट

नवी मुंबई आणि पनवेल परिसरातील सिडकोच्या वसाहतींमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे.

Swapnil S

पनवेल : नवी मुंबई आणि पनवेल परिसरातील सिडकोच्या वसाहतींमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. विशेषतः खारघर, कळंबोली आणि तळोजा या भागांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, नागरिकांना नळाला पाणी येण्याची तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. काही भागांत अवघ्या काही मिनिटांसाठी पाणीपुरवठा होत असल्याने रहिवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

नवी मुंबई महापालिकेकडून सिडकोला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात कपात झाल्यामुळे सिडको वसाहतींमधील पाणीटंचाईचे संकट अधिकच गडद झाल्याचे सांगण्यात येत आहे. तळोजा नोडमध्ये पाण्याची मागणी आणि उपलब्धता यामध्ये मोठी तफावत आहे. तळोजाला दररोज सुमारे २२ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाण्याची गरज असताना प्रत्यक्षात केवळ ८ एमएलडी पाणी मिळत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

कळंबोली परिसराला दररोज सुमारे ३० एमएलडी पाण्याची आवश्यकता असताना २२ एमएलडी पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे तब्बल ८ एमएलडी पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. खारघरची पाण्याची गरज सुमारे ८५ एमएलडी असून, प्रत्यक्षात ७५ एमएलडी पाणीपुरवठा होत असल्याचे सांगण्यात येते.

भविष्यातील पाण्याची गरज भागविण्यासाठी शिलार धरणातून पाणी आणण्याचे नियोजन असून, त्यासाठी आणखी काही वर्षांचा कालावधी अपेक्षित आहे. तसेच पाताळगंगा नदीतून अतिरिक्त पाणी आणण्यासाठी प्रस्तावित जलवाहिनीचे कामही विलंबाने सुरू असल्याने सध्याच्या पाणीटंचाईवर तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे पाटील यांनी सांगितले.

टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठ्याची मागणी

गणेशोत्सवाच्या काळात घरात पाहुणे आणि नातेवाईक येत असताना पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे. त्यामुळे सिडको आणि संबंधित प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना करून नियमित पाणीपुरवठा करावा, अशी मागणी रहिवाशांकडून होत आहे. पाणीप्रश्न सुटेपर्यंत नागरिकांना मोफत टँकरद्वारे पाणी उपलब्ध करून द्यावे, तसेच पुरेसा पाणीपुरवठा होईपर्यंत नवीन बांधकामांना परवानगी आणि भोगवटा प्रमाणपत्रे देण्यास स्थगिती द्यावी, अशी मागणीही करण्यात येत आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

आजारपणात केलेल्या मृत्यूपत्राला मान्यता; मुंबई उच्च न्यायालयाने पत्नी, मुलांचा दावा फेटाळला

चंद्रा विरुद्ध टाटा! चंद्रशेखरन यांच्या फेरनियुक्तीला टाटा ट्रस्टचे कायदेशीर आव्हान

अडवाणी, सिसोदियांना नोटीस; मतदारयादी तपासणीमध्ये पूर्वीच्या यादीशी मेळ न जुळल्याने कारवाई

Maharashtra TET Paper Leak : दोन फरार आरोपींना अटक

Mumbai : आयआयटी प्राध्यापक मंचाचा दुल्ला यांना पाठिंबा