संग्रहित छायाचित्र  
नवी मुंबई

Navi Mumbai : सिडकोच्या ४,५०८ गृहनिर्माण योजनेला विक्रमी प्रतिसाद; अवघ्या ७ दिवसांत १४,७९६ अर्ज

नवी मुंबईत सिडकोतर्फे जाहीर केलेल्या ४,५०८ घरांच्या 'प्रथम येणाऱ्यास प्राधान्य' योजनेला अवघ्या एका आठवड्यात प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. सिडकोच्या माहितीनुसार, आतापर्यंत १४,७९६ अर्जदारांनी ऑनलाईन नोंदणी करून आपली कागदपत्रेही अपलोड केली आहेत.

Mayuri Gawade

नवी मुंबईत सिडकोतर्फे जाहीर केलेल्या ४,५०८ घरांच्या 'प्रथम येणाऱ्यास प्राधान्य' (First Come, First Served) योजनेला अवघ्या एका आठवड्यात प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. सिडकोच्या माहितीनुसार, आतापर्यंत १४,७९६ अर्जदारांनी ऑनलाईन नोंदणी करून आपली कागदपत्रेही अपलोड केली आहेत.

यापूर्वी सिडकोच्या योजना लॉटरी पद्धतीने होत असत, मात्र पहिल्यांदाच लॉटरीशिवाय जो पहिला अर्ज करेल त्याला घराची प्राधान्याने संधी देणारी ही नवी पद्धत नागरिकांना मोठ्या प्रमाणात भावली आहे.

२१ डिसेंबरपर्यंत नोंदणीची संधी

या संपूर्ण प्रक्रियेसाठी सिडकोने २१ डिसेंबर २०२५ पर्यंत वेळ दिला आहे. त्यामुळे अद्याप अर्ज न केलेल्या नागरिकांना देखील पुरेशी संधी उपलब्ध आहे.

सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांनी सांगितले की, "योजनेस नागरिकांचा प्रतिसाद उत्साहवर्धक आहे. आणखीही अनेक अर्जदार या योजनेत सहभागी होतील याची आम्हाला खात्री आहे."

२८ डिसेंबरपासून पसंतीचे घर निवडता येणार

  • अर्जदारांच्या कागदपत्रांची छाननी करण्यात येईल.

  • पात्र अर्जदारांना अंतिम नोंदणी दिल्यानंतर २८ डिसेंबर २०२५ पासून ऑनलाईन पद्धतीने आपलं पसंतीचं घर निवडता येणार आहे.

  • सर्व कागदपत्रे आणि पेमेंट पूर्ण झाल्यानंतर तत्काळ घर ताब्यात मिळण्याची सुविधा देण्यात आली आहे.

योजनेतील घरांची वैशिष्ट्ये

या योजनेतील सर्व ४,५०८ घरं रेडी टू मुव्ह आहेत. म्हणजेच बांधकाम पूर्ण असून राहण्यास तत्काळ उपलब्ध आहेत.

ही घरं खालील मोक्याच्या ठिकाणी आहेत-

  • खारघर

  • कळंबोली

  • तळोजा

  • ड्रोणागिरी

  • घनसोली

या परिसरांमध्ये शाळा, रुग्णालये, मार्केट, रोड-कनेक्टिव्हिटी यांसारख्या चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत.

EWS व LIG गटांसाठी मोठी संधी

योजनेत समाविष्ट घरांचे विभाजन असे-

  • EWS (आर्थिक दुर्बल घटक) - १,११५ घरे (PMAY अंतर्गत)

  • LIG (कमी उत्पन्न गट) - ३,३९३ घरे

PMAY योजनेत येणाऱ्या EWS नागरिकांना २.५ लाख रुपायांची अनुदान मदत देखील मिळू शकते.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळची सोयीस्कर लोकेशन

सर्व घरं नव्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जवळ आहेत.
तसेच सबअर्बन रेल्वे, मेट्रो आणि हायवे कनेक्टिव्हिटीमुळे या परिसरांना भविष्यात मोठी वाढीची संधी आहे.

सिडकोच्या या योजनेमुळे नवीन वर्षात अनेकांचे स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार असल्याचा विश्वास सिडकोने व्यक्त केला आहे. नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहता, येत्या काही दिवसांत अर्जसंख्या आणखी वाढेल असे स्पष्ट दिसत आहे.

Venezuela Earthquake : भीषण भूकंपाने व्हेनेझुएला हादरला! ३२ जणांचा मृत्यू, ७०० हून अधिक जखमी; इमर्जन्सी जाहीर

'बँक ऑफ इंडिया'ला १ कोटी डॉलर्स देण्याचे नीरव मोदीला आदेश

भारत-अमेरिका व्यापार करारातील तरतुदींचा आढावा; शुल्क आकारणीतील अडथळे कमी करण्यावर भर

मराठी भाषेसाठी विकास केंद्रे उभारणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा

Thane : बारवी धरणक्षेत्राला पावसाची प्रतीक्षा; यंदाच्या पावसाळ्यात अवघ्या १७ मिमी पावसाची नोंद