संग्रहित छायाचित्र  
नवी मुंबई

Navi Mumbai : सिडको गृहनिर्माण योजनेला गुढीपाडव्यापर्यंत मुदतवाढ; घर निवडीसाठी १९ मार्चपर्यंत संधी

सिडको महामंडळातर्फे राबविण्यात येत असलेल्या १६,८७६ सदनिकांच्या ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर 'माझा फर्स्ट चॉइस नवी मुंबई’ या गृहनिर्माण योजनेत घरांच्या पर्याय निवडीसाठी १९ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Swapnil S

नवी मुंबई : सिडको महामंडळातर्फे राबविण्यात येत असलेल्या १६,८७६ सदनिकांच्या ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर 'माझा फर्स्ट चॉइस नवी मुंबई’ या गृहनिर्माण योजनेत घरांच्या पर्याय निवडीसाठी १९ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अधिकाधिक सर्वसामान्य नागरिकांना हक्काच्या घराचे स्वप्न साकार करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

या योजनेंतर्गत नवी मुंबईतील वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर, तळोजा, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोली या नोडमध्ये प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) व अल्प उत्पन्न गट (LIG) यांच्यासाठी १६,८७६ सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात उभारण्यात येत असलेल्या या गृहसंकुलांना रेल्वे, महामार्ग आणि मेट्रोद्वारे उत्कृष्ट संपर्क सुविधा उपलब्ध आहे. या गृहनिर्माण योजनेसाठी अनामत रक्कम भरण्याची अंतिम तारीख १५ मार्च निश्चित करण्यात आली आहे. तसेच घर खरेदी इच्छुकांना आपले पसंतीचे पर्याय निवडण्यासाठी १९ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

इच्छुक नागरिकांनी योजनेत सहभागी होण्यासाठी www.cidcohomes.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.

ई-२० इंधनाचा वापर सुरक्षितच; वाहन विम्याच्या वैधतेवर परिणाम होणार नसल्याचा सरकारचा दावा

Venezuela Earthquake : भीषण भूकंपाने व्हेनेझुएला हादरला! ३२ जणांचा मृत्यू, ७०० हून अधिक जखमी; इमर्जन्सी जाहीर

'बँक ऑफ इंडिया'ला १ कोटी डॉलर्स देण्याचे नीरव मोदीला आदेश

भारत-अमेरिका व्यापार करारातील तरतुदींचा आढावा; शुल्क आकारणीतील अडथळे कमी करण्यावर भर

मराठी भाषेसाठी विकास केंद्रे उभारणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा