नवी मुंबई

प्रेमाला नकार दिल्याचा राग; तरुणीच्या डोक्यात घातला लोखंडी रॉड, न्हावे गावातील घटना

उरणमधील यशश्री शिंदे या तरुणीची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच न्हावे गावात राहणाऱ्या प्रितम अरुण म्हात्रे या तरुणाने एकतर्फी प्रेमातून गावातीलच एका २४ वर्षीय तरुणीवर लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे.

Swapnil S

नवी मुंबई : उरणमधील यशश्री शिंदे या तरुणीची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच न्हावे गावात राहणाऱ्या प्रितम अरुण म्हात्रे या तरुणाने एकतर्फी प्रेमातून गावातीलच एका २४ वर्षीय तरुणीवर लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात सदर तरुणी गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर न्हावाशेवा पोलिसांनी आरोपी प्रीतम म्हात्रे याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

या प्रकरणातील आरोपी प्रितम म्हात्रे व जखमी तरुणी हे दोघेही न्हावे गावात राहण्यास आहेत. दोन वर्षांपूर्वी प्रीतम म्हात्रे याने तरुणीला प्रपोज केले होते. त्यावेळी पीडित तरुणीने त्याला नकार दिला होता. याचा राग प्रीतमच्या मनात होता. २६ जुलै रोजी पीडित तरुणी न्हावे गावाजवळ आपल्या मैत्रिणींसह गेली असताना, त्याठिकाणी गेलेल्या प्रीतम म्हात्रे याने पीडित तरुणीवर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला करून पलायन केले. या हल्ल्यात पीडित तरुणी गंभीर जखमी झाल्याने तीला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

BMC Election : महायुतीचे २०७ जागांवर एकमत, २० जागांवर चर्चा सुरू

आरोपी बंडू आंदेकर निवडणुकीच्या रिंगणात; हातात बेड्या, गळ्यात दोरखंड, घोषणाबाजी करत अर्ज भरायला गेला, पण...

BMC Election : शिवसेना-मनसे जागावाटप अंतिम टप्प्यात - संजय राऊत

भीमाशंकर मंदिर तीन महिन्यांसाठी बंद; ९ जानेवारीपासून अंमलबजावणी

तुळजापुरात भीषण दुर्घटना! विहिरीतील मोटार काढताना शॉक लागला; बाप-लेकासह चौघांचा मृत्यू