नवी मुंबई : Reel साठी लोकलवर दगडफेक केल्याचा 'अभिनय'? VIDEO व्हायरल होताच तरुणावर कारवाई, माफी मागत म्हणाला... 
नवी मुंबई

नवी मुंबई : Reel साठी लोकलवर दगडफेक केल्याचा 'अभिनय'? VIDEO व्हायरल होताच तरुणावर कारवाई, माफी मागत म्हणाला...

धावती लोकल जवळून जात असताना तो तरुण तिच्या दिशेने दगड फेकतो. याचवेळी तो लोकलमधील प्रवाशांकडे अश्लील हातवारे करतानाही दिसतो...

Mayuri Gawade

रील बनवण्याच्या नादात नवी मुंबईत दिघा परिसरात धावत्या लोकलच्या दिशेने दगड फेकत असल्याचा व्हिडीओ तयार करणं तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तरुणाचा शोध घेतला. त्याच्यावर सानपाडा RPF कडून रेल्वे कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. त्यानंतर तरुणाने हात जोडून माफी मागत, हा प्रकार केवळ रीलसाठी केल्याचा दावा केला आहे.

धावत्या लोकलच्या दिशेने दगड फेकल्याचा VIDEO

व्हायरल व्हिडीओमध्ये तरुण रेल्वे रुळांजवळ उभा असल्याचं दिसत आहे. धावती लोकल जवळून जात असताना तो तिच्या दिशेने दगड फेकतो. याचवेळी तो लोकलमधील प्रवाशांकडे अश्लील हातवारे करतानाही दिसत आहे.

धावत्या रेल्वेवर याप्रकारे दगड किंवा अन्य वस्तू फेकल्यास प्रवासी जखमी होण्याबरोबरच गंभीर अपघातही घडू शकतो. त्यामुळे हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली.

'ट्रेनवर दगड फेकला नाही'

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तरुणाचा शोध घेतला. त्यानंतर त्याने सोशल मीडियावर माफी मागणारा व्हिडीओ शेअर केला. हात जोडून माफी मागताना त्याने सांगितलं की, ट्रेनवर प्रत्यक्षात दगड फेकण्याचा हेतू नव्हता. Reel बनवण्यासाठी ट्रेनच्या दिशेने दगड फेकत असल्याचा केवळ अभिनय केला होता आणि दगड बाजूला फेकला होता, असा त्याचा दावा आहे. पुन्हा अशी चूक करणार नसल्याचं सांगत त्याने माफी मागितली.

सानपाडा RPF कडून कारवाई

संबंधित दगडफेकीचा व्हायरल व्हिडीओ ठाणे रेल्वे पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर संबंधित तरुणाची ओळख पटवण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, सानपाडा RPFने तरुणाविरोधात रेल्वे कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार कारवाई केली आहे, असे 'टाइम्स ऑफ इंडिया'ने वृत्त दिले आहे.

Reelच्या नादात धोकादायक स्टंट

सोशल मीडियासाठी व्हिडीओ तयार करण्याच्या नादात रेल्वे रुळांजवळ धोकादायक स्टंट करण्याचे प्रकार यापूर्वीही समोर आले आहेत. रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांकडून वारंवार अशा प्रकारांपासून दूर राहण्याचे आवाहन केले जाते.

रेल्वे रुळांवर Reel शूट करणे किंवा प्रवाशांच्या सुरक्षिततेला धोका पोहोचेल अशी कृती केल्यास गंभीर अपघाताबरोबरच कायदेशीर कारवाईलाही सामोरे जावे लागू शकते.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Kolkata Hotel Fire: हॉटेलमध्ये आगीचा भडका! झोपेतच ९ जणांचा दुर्दैवी अंत, ६ जण जखमी; VIDEO

भारतातील रुग्णालयांचे दर हे हिमनगाचे टोक; आरोग्य सेवा क्षेत्र भांडवलप्रधान असल्याचा नॅटहेल्थचा अहवाल

कोरमअभावी टाटा सन्सची AGM अखेर तहकूब

Mumbai : पालिका मुख्यालयातील उपाहारगृह तत्काळ सुरू करा; महापौर रितू तावडेंचे निर्देश

परिणामांबाबतचा संदेश स्पष्ट; कृती, संवेदनशीलतेचे प्रदर्शन, Meta सोबतच्या चर्चेवर सरकारी अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया