नवी मुंबई

Navi Mumbai : फिनो पेमेंट्स बँकेच्या खात्यांतून १.५६ कोटींची लूट

फिनो पेमेंट्स बँकेच्या फिनोप मोबाईल ॲपमधील तांत्रिक त्रुटीचा गैरफायदा घेत सायबर चोरट्यांनी १ कोटी ५६ लाख ९१ हजार रुपयांची रक्कम अन्य बँकांच्या खात्यांवर वळवून बँकेची फसवणूक केल्याचे उघड झाले.

Swapnil S

नवी मुंबई : फिनो पेमेंट्स बँकेच्या फिनोप मोबाईल ॲपमधील तांत्रिक त्रुटीचा गैरफायदा घेत सायबर चोरट्यांनी १ कोटी ५६ लाख ९१ हजार रुपयांची रक्कम अन्य बँकांच्या खात्यांवर वळवून बँकेची फसवणूक केल्याचे उघड झाले.

सायबर चोरट्यांनी जुईनगर येथील बँकेच्या २१५ ग्राहकांच्या खात्यांमधून अंतर्गत व्यवहारांच्या माध्यमातून ३२२ खात्यांवर रक्कम वळतील केली. त्यानंतर ५२३ व्यवहारांतून ती अन्य बँकांमध्ये हस्तांतरित केल्याचे उघडकीस आले आहे. नवी मुंबई सायबर पोलिसांनी सायबर चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

१० ते १५ नोव्हेंबर या कालावधीत सायबर चोरट्यांनी तांत्रिक साधनांचा वापर करून फिनो पेमेंट्स बँकेच्या फिनोपे ऍपमधील त्रुटीचा फायदा घेत सुरुवातीला २१५ ग्राहकांच्या खात्यांमधून सुमारे १ कोटी ७४ लाख रुपये बँकेच्याच अन्य ३२२ खात्यांवर वळते केले. त्यानंतर त्यातील १ कोटी ५६ लाख ९१ हजार रुपये ५२३ व्यवहारांद्वारे विविध बँकेतील खात्यांवर पाठवले. १४ नोव्हेंबर रोजी बँकेच्या अँटी-फ्रॉड युनिटच्या लक्षात आल्यानंतर ट्रान्झॅक्शन मॉनिटरिंग विभागाने या संशयास्पद व्यवहारांची माहिती बिझनेस टेक्नॉलॉजी विभागाला दिली. त्यानंतर बँकेने अंतर्गत व्यवहारांची पडताळणी केली असता मोठ्या प्रमाणात अनधिकृत रक्कम हस्तांतरण झाल्याचे उघड झाले.

बँकेच्या इन्फॉर्मेशन सिक्युरिटी विभागाने केलेल्या तांत्रिक तपासात दोन आयपी ॲड्रेसच्या माध्यमातून ही लूट करण्यात आल्याचे आढळले. त्यानंतर बँकेच्या वतीने स्वप्निल तांडेल यांनी २० नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय सायबर गुन्हे तक्रार पोर्टलवर दोन तक्रारी नोंदवून ५२३ संशयास्पद व्यवहारांचा तपशील सादर केला. त्यानंतर २१ नोव्हेंबर रोजी नवी मुंबई सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

ग्राहकांना पैसे केले परत

या प्रकरणात संबंधित २१५ ग्राहकांची कोणतीही चूक नसल्याचे तपासणीत निष्पन्न झाल्यानंतर बँकेने १७ नोव्हेंबर रोजी १ कोटी ५६ लाख ९१ हजार रुपये ग्राहकांना परत केले. तर उर्वरित सुमारे १८ लाख रुपये बँकेच्या अन्य खात्यांमध्ये आढळल्याने ती रक्कम गोठवली आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

कर्ज थकवल्यास जामीनदारावर स्वतंत्र कायदेशीर कारवाईला मुभा; सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

भिवंडीत शॉरमा खाल्ल्याने ११ जणांना विषबाधा; ठाण्यात FDA, पालिकेकडून चौकशी सुरू

आरोपीने मुंबईच्या गोदीत ९० व्हिडीओ केले चित्रित; पाक गुप्तचर यंत्रणेशी संबंधितांशी संपर्कात असल्याचा पोलिसांचा दावा

अयोध्या-जनकपूर रेल्वेने ४०० भारतीय भाविक नेपाळमध्ये

रायगडमध्ये महेंद्र दळवींचा भाजपविरोधात संघर्ष?