Navi Mumbai : डाळिंबाचा दर दुप्पट; पपई, केळी, संत्रीही महागली 
नवी मुंबई

Navi Mumbai : डाळिंबाचा दर दुप्पट; पपई, केळी, संत्रीही महागली

जीवनावश्यक अन्नधान्याच्या वाढत्या किंमती, वाढते इंधन दरामुळे महागाईच्या झळा वाढत असतानाच आता त्याचा फटका फळ बाजारालाही बसू लागला आहे. डाळिंबाचा दर दुप्पट झाला असून केळी, संत्री, सफरचंदाचे दर २५ ते ५० टक्के वाढले आहेत.

Swapnil S

नंदकुमार ठाकूर/नवी मुंबई

जीवनावश्यक अन्नधान्याच्या वाढत्या किंमती, वाढते इंधन दरामुळे महागाईच्या झळा वाढत असतानाच आता त्याचा फटका फळ बाजारालाही बसू लागला आहे. डाळिंबाचा दर दुप्पट झाला असून केळी, संत्री, सफरचंदाचे दर २५ ते ५० टक्के वाढले आहेत.जागतिक संघर्ष, देशात पडलेला दुष्काळ आणि प्रतिकूल हवामानाचा फटका फळ बाजाराला बसत आहे.

वाशीच्या एपीएमसी फळ बाजारात यंदा विविध फळांच्या किंमतीत १५ ते ५० टक्क्यांपर्यंत वाढ झाली. वाशी बाजारात सध्या रोज सुमारे ३५० ते ४०० टन सफरचंदांची आवक होत आहे. मात्र, काश्मीर आणि हिमाचल प्रदेशातील उत्पादनावर परिणाम झाल्यामुळे सफरचंदांच्या दरात गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच संत्री (१०० ते ११५ टन) आणि मोसंबी (२६० ते २८० टन) यांची आवक १५ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. पपई आणि केळीच्या दरातही अनुक्रमे ३० टक्क्यांपर्यंत उसळी आली आहे.

परदेशी फळांचे दरही वधारले

जागतिक संघर्षाचा फटका परदेशी फळांनाही फटका बसला आहे. फळ व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार, दक्षिण आफ्रिकेतून सिट्रस वर्ग, मँडरिन आणि ॲव्होकॅडोची मोठी आयात होते, तर न्यूझीलंड, वॉशिंग्टन, युरोप आणि ऑस्ट्रेलियातून सफरचंद, किवी, चेरी व ब्लूबेरी येतात. मात्र, जागतिक स्तरावरील अस्थिरतेमुळे पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. सध्या इराणमधून सफरचंदांची आवक पूर्णपणे बंद असून, तुर्कस्तानातून होणारी आयातही रोडावली आहे. यामुळे परदेशी फळांचे दरही वधारले आहेत.

जागतिक पातळीवरील वाहतूक आणि पुरवठ्यातील अडचणी तसेच देशातील अवकाळी पाऊस आणि दुष्काळी परिस्थितीमुळे यंदा फळांचे उत्पादन घटले आहे. याचा थेट परिणाम घाऊक बाजारावर होऊन किंमती वाढल्या आहेत.
गजानन शिंदे, फळ व्यापारी, एपीएमसी बाजार, वाशी

दिवाळीभेट! शेतकऱ्यांना पाच हजाराची मदत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर

महागाईचा आगडोंब! सप्टेंबरमध्ये नवीन मालिकेतील चलनवाढीचा उच्चांकी दर

शेतात पीक नाही, बाजारात महागाई; ताटाचा हिशोब बिघडणार

मस्क-अंबानी वादामागचे जागतिक राजकारण

Ghee Purity Test : शुद्ध समजून भेसळयुक्त तूप तर खात नाही ना? 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका