नवी मुंबई

Navi Mumbai : जेएनपीए बंदरात बाओफेंग वॉकी टॉकी जप्त; DRI ची मोठी कारवाई

नवी मुंबईतील जेएनपीए बंदरावर महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआर) मोठी कारवाई केली आहे. सुरक्षेला धोका निर्माण करू पाहणारे आणि भारतात काळ्या यादीत टाकण्यात आलेले चिनी बनावटीचे ‘बाओफेंग' वॉकी-टॉकी संच’ डीआरआयने जप्त केले आहेत.

Swapnil S

उरण : नवी मुंबईतील जेएनपीए बंदरावर महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआर) मोठी कारवाई केली आहे. सुरक्षेला धोका निर्माण करू पाहणारे आणि भारतात काळ्या यादीत टाकण्यात आलेले चिनी बनावटीचे ‘बाओफेंग' वॉकी-टॉकी संच’ डीआरआयने जप्त केले आहेत. या कारवाईत ९.२५ कोटी रुपयांचा प्रतिबंधित माल जप्त केला. या प्रकरणी दोघांना सीमाशुल्क कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे.

डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. चीनमधून आलेल्या आणि विविध इलेक्ट्रॉनिक्स साहित्याची चुकीची माहिती देऊन मागवलेल्या आठ कंटेनर्सना बंदरावर रोखण्यात आले. या संपूर्ण शिपमेंटची एकूण किंमत सुमारे ३०.२५ कोटी रुपये आहे. यात २१ कोटी रुपयांच्या इतर संकीर्ण इलेक्ट्रॉनिक साहित्याआड हा प्रतिबंधित माल लपवून आणण्यात आला होता.

दूरसंचार विभागाने चिनी वॉकी-टॉकी मॉडेलला भारतात काळ्या यादीत टाकले. ही उपकरणे फ्रिक्वेन्सी मर्यादेपलीकडे जाऊन काम करतात. या उपकरणांच्या वापरासाठी भारतात विशेष परवान्याची आवश्यकता असते. तसेच, जुन्या किंवा सेकंड-हॅन्ड हार्ड डिस्क भारतात आयात करण्यासाठी परकीय व्यापार महासंचालनालयाच्या पूर्वपरवानगीची गरज असते. मात्र, परवाना न घेता नियम धाब्यावर बसवून ही आयात केली जात होती.

जप्त करण्यात आलेल्या मालाचा तपशील:

बाओफेंग ‘बीएफ-८८८एस’ वॉकी-टॉकी: ११ हजार ६० वॉकी-टॉकी संच जप्त (किंमत ₹२.५ कोटी).

जुन्या हार्ड डिस्क (HDDs): ई-कचरा प्रवर्गातील सेकंड-हॅन्ड हार्ड डिस्क जप्त (किंमत ₹६.७५ कोटी).

Mumbai Rain Alert : समुद्रात उंच भरतीची शक्यता; मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे सतर्कतेचा इशारा

Kasara Ghat Landslide : जुन्या कसारा घाटात दरड कोसळली; मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक विस्कळीत, Video

उरण : जेएनपीए बंदरात वादळी वाऱ्याचा तडाखा; कंटेनर पडून एका कामगाराचा मृत्यू

ठाण्याचा मासुंदा तलाव तुडुंब; बाजारपेठेत पाणी शिरले

काँग्रेसचे आजपासून राज्यभर आंदोलन; ९ जुलैपासून 'रघुपती राघव राजाराम' सत्याग्रह