Navi Mumbai : रबाळ्यात विवाहितेची आत्महत्या प्रातिनिधिक छायाचित्र
नवी मुंबई

Navi Mumbai : रबाळ्यात विवाहितेची आत्महत्या

पोलीस पतीच्या मानसिक आणि शारीरिक छळवणुकीला कंटाळून त्याच्या पत्नीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रबाळे येथे उघडकीस आली आहे.

Swapnil S

नवी मुंबई : पोलीस पतीच्या मानसिक आणि शारीरिक छळवणुकीला कंटाळून त्याच्या पत्नीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रबाळे येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात सदर पोलिसाविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेतील मृत विवाहितेचे नाव अनिता डोळस असे असून ती रबाळे गावात गणेश कृपा अपार्टमेंटमध्ये पती अरुण मोहन डोळस व दोन मुलांसह राहत होती. अनिताने वकिलीचे शिक्षण घेतले होते. तसेच ती ठाणे येथील कोर्टात प्रॅक्टिस करत होती. अनिताचा पती अरुण डोळस हा पोलीस आहे. अरुण याचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. यावरून सन २०२३ पासून पती-पत्नीत वाद होत होते. या वादातून आरोपी अरुण हा पत्नी अनिता हिला सतत मानसिक त्रास देत होता.

अनिताला डॉक्टरांनी गर्भपाताच्या गोळ्या दिल्याने तिला त्रास होत होता. तरीही अरुण हा तिला सोडून गावी निघून गेला होता. त्यामुळे संतप्त अनिताने पती अरुण याला व्हिडीओ कॉल करून पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

शेजारीच राहणाऱ्या अनिताच्या आई वडिलांनी तिला रुग्णालयात दाखल केले होते. मात्र तीन दिवसाच्या उपचारानंतर तिचा रुग्णालयात मृत्यू झाला.

Video : नेपाळमध्ये महाप्रलय! भोटे कोशी नदीला अचानक महापूर; अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती, किमान १०५ भारतीय पर्यटक बेपत्ता

शासकीय, खासगी, धर्मादाय रुग्णालयांचे फायर ऑडिट; तातडीने कार्यवाही करण्याचे आरोग्य मंत्र्यांचे निर्देश, राज्य सरकार ॲक्शन मोडवर

Pune : भटक्या कुत्र्याचा महिलेवर हल्ला; तोल जाताच बाळ पडलं खाली, Video व्हायरल

Mumbai : निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता; राजावाडी रुग्णालयातील अन्य डॉक्टरांवर ताण, दिवसाला ५०० रुग्णांची तपासणी

Madhya Pradesh : भाजप आमदाराने अग्निशमन दलाच्या वाहनाने धुतली स्वतःची कार; VIDEO व्हायरल