नवी मुंबईत उद्यापासून दोन दिवस पाणीबाणी; भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्राची देखभाल दुरुस्ती होणार 
नवी मुंबई

नवी मुंबईत उद्यापासून दोन दिवस पाणीबाणी; भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्राची देखभाल दुरुस्ती होणार

नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारी मोरबे धरणाची जलवाहिनी आणि भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्राची दोन दिवस देखभाल दुरुस्ती करण्यात येणार आहे.

Swapnil S

नवी मुंबई : नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारी मोरबे धरणाची जलवाहिनी आणि भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्राची दोन दिवस देखभाल दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा येत्या बुधवारी सकाळी दहापासून ते गुरुवारी सकाळी दहापर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. लागोपाठ दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

प्रत्येक वर्षी पावसाळ्याच्या तोंडावर नवी मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून जलवाहिनीसह भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्राची देखभाल दुरुस्ती केली जाते. यंदाही हे काम येत्या बुधवारपासून हाती घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर सीबीडी बेलापूर येथील सेक्टर-२८ मधील पंपगृहात १ हजार ८०० मिलीमीटर व्यासाचा व्हॉल्व बसविणे, भोकरपाडा २.५ दशलक्ष लिटर क्षमतेच्या जलसाठा केंद्रात मुख्य जलवाहिनी जोडणी करणे, भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातील मुख्य जलवाहिनीवर २ हजार ४०० मिलीमीटर व्यासाचा व्हॉल्व बसविणे, आदई येथे १ हजार ८०० मिलीमीटर व्यासाचा व्हॉल्व बसविणे, स्काडा अंतर्गत तांत्रिक कामे आणि पावसाळापूर्व विद्युत दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत.

१. देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली आणि ऐरोली येथे पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार.

२. मोरबे धरणातून पनवेल पालिकेतील खारघर व कामोठे नोडमध्येही पाणीपुरवठा केला जातो. दोन दिवस इथेही पाणीपुरवठाही बंद ठेवणार.

३. दुरुस्तीमुळे पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे वेळापत्रक लांबणार आहे. त्यामुळे गुरुवारी पाणीपुरवठा कमी दाबाने आणि अपुरा होण्याची शक्यता आहे.

SpiceJet Flight : टेकऑफच्या आधी विमानात असह्य उकाडा; श्वास घेण्यासही त्रास, प्रवाशांचा संताप, Video व्हायरल

Mumbai : घाटकोपरमध्ये दरड कोसळली; ६ जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू, Video

Mumbai Crime : प्रेमविवाहानंतर ५ वर्षांत संसाराचा भयंकर शेवट! पत्नीच्या छातीत चाकू भोसकला, ४ वर्षांच्या मुलाला सोडून पती फरार

Gujarat : इमारतीच्या ३२व्या मजल्यावर क्रेनला लटकलेल्या अवस्थेत कामगाराचा मृतदेह; धक्कादायक घटनेचा VIDEO समोर

IndiGo विमानाचं इंजिन हवेतच बंद; २२४ प्रवाशांचा जीव टांगणीला, चेन्नई विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग