Navi Mumbai : घटस्फोट न घेताच आर्किटेक्टशी थाटला दुसरा संसार; ८० लाखांची फसवणूक करणाऱ्या माय-लेकीवर गुन्हा 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
नवी मुंबई

Navi Mumbai : घटस्फोट न घेताच आर्किटेक्टशी थाटला दुसरा संसार; ८० लाखांची फसवणूक करणाऱ्या माय-लेकीवर गुन्हा

पहिल्या पतीपासून घटस्फोट झालेला नसतानाही, ती बाब पूर्णपणे लपवून ठेवून खारघर येथील एका नामांकित आर्किटेक्टसोबत दुसरा विवाह करत त्यांची ८० लाख ४४ हजार ५३१ रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार खारघरमध्ये उघडकीस आला आहे.

Swapnil S

नवी मुंबई : पहिल्या पतीपासून घटस्फोट झालेला नसतानाही, ती बाब पूर्णपणे लपवून ठेवून खारघर येथील एका नामांकित आर्किटेक्टसोबत दुसरा विवाह करत त्यांची ८० लाख ४४ हजार ५३१ रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार खारघरमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात फसवणूक करणारी महिला आणि तिच्या आईविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार आर्किटेक्ट आहेत. २०२२ मध्ये या आर्किटेक्टची आरोपी महिलेसोबत ओळख झाली होती. त्यावेळी आरोपी महिलेने घटस्फोट झालेला नसल्याची माहिती लपवून ठेवून, आर्किटेक्टची दिशाभूल करून त्याच्यासोबत मैत्री वाढवली. त्यांच्याशी दुसरा विवाह केला.

लग्नानंतर आरोपी महिलेने व तिच्या आईने संगनमत करून आर्किटेक्टकडून २० लाख ५१ रुपये रोख आणि ५९,९२,७२६ रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने, असा एकूण ८० लाख ४४ हजार रुपयांचा ऐवज घेऊन त्यांची आर्थिक फसवणूक केली. याच कालावधीत आरोपी महिलेने २०१८ मध्ये आर्किटेक्टसोबत वाशी येथील एका आय. व्ही. एफ. सेंटरमध्ये लग्न झाल्याचे खोटे शपथपत्र तयार करून त्या खोट्या शपथपत्राचा वापर तिने पिरामल कॅपिटल अँड हाऊसिंग फायनान्स कंपनीकडून कर्ज घेण्यासाठी केला.

ही बाब आर्किटेक्टला समजल्यानंतर त्याने आरोपी महिलेकडे याबाबत विचारणा केली असता, तिने व तिच्या आईने त्यांना उलट खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. अखेर या मानसिक व आर्थिक त्रासाला कंटाळून आर्किटेक्टने खारघर पोलिस ठाण्यात धाव घेतली.

Mumbai : महापौरांचा पती असल्याचे सांगत शिक्षकाच्या फोटोचा गैरवापर; बदनामीकारक यूट्यूब व्हिडीओप्रकरणी FIR दाखल

Mumbai : चेंबूरमध्ये धक्कादायक प्रकार! चारित्र्यावर संशय घेत गर्भवती प्रेयसीचा काढला काटा; प्रियकराला अटक

Video : चुकून लेडीज डब्यात चढला; धावत्या लोकलमधून उडी मारणार इतक्यात...

Navi Mumbai : रबाळे एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग; परिसरात धुराचे लोट, Video

शक्तिपीठ महामार्गासाठी भूसंपादनाला मिळाली गती; शेतकऱ्यांचा विश्वास जिंकण्यासाठी कार्यशाळांचे आयोजन