Navi Mumbai : एमपीएससी कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद 
नवी मुंबई

Navi Mumbai : एमपीएससी कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद

संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना काळे फासल्याच्या निषेधार्थ एमपीएससीच्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

Swapnil S

नवी मुंबई: संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना काळे फासल्याच्या निषेधार्थ एमपीएससीच्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची ठोस, स्पष्ट आणि प्रभावी हमी शासनाकडून मिळेपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच राहणार असल्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या प्रशासकीय प्रमुखांवर झालेला हा हल्ला म्हणजे थेट राज्यघटनेच्या व्यवस्थेवर झालेला आघात असल्याचे सांगत अधिकारी वर्गाने तीव्र संताप व्यक्त केला आहे. आयोगाचे सचिव हरपाळकर यांच्यावर हल्ला करणाऱ्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर आल्यास गोळ्या घालू व ठोकून काढू आदी उघड धमक्या दिल्या आहेत. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचारी वर्गात कमालीची भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण पसरल्याचे आयोगातील आंदोलक कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Maratha Reservation : मराठ्यांचे वादळ धडकणार; 'मुंबईत जाणारच' जरांगेंची घोषणा, १९ सप्टेंबरपासून आझाद मैदानात उपोषण

Mumbai Modak Mahotsav 2026 : बाप्पाचा आवडता खाऊ मुंबईकरांना घरपोच; उकडीच्या व तळलेल्या मोदकांचा घेता येणार आस्वाद

BRICS Summit 2026 : पहलगाम हल्ल्याचा 'ब्रिक्स'कडून निषेध; 'नवी दिल्ली घोषणापत्र' स्वीकारले

Kolhapur : माधुरी हत्तीणीचे जंगी स्वागत, Video

Mumbai : २१ स्टॉल केले जमीनदोस्त; मानखुर्द, गोवंडीत अतिक्रमणविरोधी मोहीम, पालिकेच्या एम-पूर्व विभागाची कारवाई