Navi Mumbai : विद्यार्थ्यांनीच सांभाळली वाहतुकीची धुरा; 'वन डे ट्रॅफिक कॉप्स'ला उत्स्फूर्त प्रतिसाद प्रातिनिधिक छायाचित्र
नवी मुंबई

Navi Mumbai : विद्यार्थ्यांनीच सांभाळली वाहतुकीची धुरा; 'वन डे ट्रॅफिक कॉप्स'ला उत्स्फूर्त प्रतिसाद

नवी मुंबई महामार्गालगतच्या शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत नवी मुंबई वाहतूक पोलिसांकडून राबविण्यात येणाऱ्या ‘वन डे ट्रॅफिक कॉप्स’ उपक्रमाला सीवूड्स येथील ज्ञानदीप शाळेतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे ६० स्काऊट-गाइड विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.

Swapnil S

नवी मुंबई : महामार्गालगतच्या शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत नवी मुंबई वाहतूक पोलिसांकडून राबविण्यात येणाऱ्या ‘वन डे ट्रॅफिक कॉप्स’ उपक्रमाला सीवूड्स येथील ज्ञानदीप शाळेतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे ६० स्काऊट-गाइड विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.

२५ ऑगस्ट रोजी सीवूड्स वाहतूक शाखेच्या वतीने करावे गाव परिसरातील ज्ञानदीप शाळा, टी. एस. चाणक्य सिग्नल आणि करावे गाव कमान येथे हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना वाहतूक नियम, सिग्नलचे महत्त्व, सुरक्षितपणे रस्ता ओलांडण्याची पद्धत तसेच पादचाऱ्यांना वाहनचालकांनी द्यावयाचे प्राधान्य याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी वाहतूक पोलिसांसोबत रस्त्याच्या दोन्ही बाजूंची वाहतूक सुरक्षितपणे थांबवून शाळकरी मुलांना रस्ता ओलांडून देण्याचे प्रात्यक्षिक केले. ‘वाहतूक नियम प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षिततेसाठी आहेत’, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. पोलीस उपायुक्त डॉ. राहुल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहिनी लोखंडे व वाहतूक शाखेच्या अंमलदारांनी हा उपक्रम राबविला.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Nepal Floods : पुरात वाहून आलेल्या मृतदेहालाही सोडलं नाही! दागिन्यांवर डल्ला, VIDEO व्हायरल होताच दोघांना बेड्या

मानखुर्द येथील शाळांना उच्च न्यायालयाचा दिलासा; फौजदारी कारवाईला तात्पुरती स्थगिती

Mumbai : पालिका शाळांमध्ये निकृष्ट मध्यान्ह भोजन; विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका, कारवाई करा

...तरच कोकण रेल्वेचे विलीनीकरण; राज्यांनी हिस्सा सोडल्यानंतर भारतीय रेल्वेसोबत एकत्रीकरण शक्य, रेल्वे मंत्रालयाचे स्पष्टीकरण

Mumbai Metro 7A : आराखड्यातील चुकीमुळे २६० कोटींचा फटका; सल्लागाराच्या निष्काळजीपणावरून MMRDA वर टीका