प्रातिनिधिक छायाचित्र 
नवी मुंबई

Navi Mumbai : पनवेल-कळंबोली दरम्यान आज रात्री पॉवरब्लॉक

मध्य रेल्वेद्वारा डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन (डीएफसीसी) प्रकल्पाच्या अनुषंगाने, ११० मीटर लांबीच्या वेब गर्डर उभारणीसाठी पनवेल-कळंबोली दरम्यान अप व डाऊन मुख्य मार्गांवर विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक्स घेण्यात येणार आहेत.

Swapnil S

मुंबई : मध्य रेल्वेद्वारा डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन (डीएफसीसी) प्रकल्पाच्या अनुषंगाने, ११० मीटर लांबीच्या वेब गर्डर उभारणीसाठी पनवेल-कळंबोली दरम्यान अप व डाऊन मुख्य मार्गांवर विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक्स घेण्यात येणार आहेत. या ब्लॉक्सच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे आणखी लहान ब्लॉक्सही परिचालित करण्यात येणार आहेत.

पनवेल येथे सबवे बांधकामासाठी रेल्वे मार्गाखाली तात्पुरता स्टील गर्डर बसविण्यासाठी ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक, पनवेल स्थानकावर पादचारी पूल बांधकामासाठी गर्डर उभारणीचे काम, पनवेल-कर्जत विभागात पादचारी पूल तोडण्यासाठी ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेतला जाईल.

२५ व २६ (रविवार/सोमवार मध्यरात्री) रोजी कळंबोली-पनवेल दरम्यान, रात्रौ ०१.२० ते ०५.२० वाजेपर्यंत (४ तास) पॉवरब्लॉक घेतला जाईल.

मडगाव जं.- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोकण कन्या एक्स्प्रेस सोमटणे स्थानकावर पहाटे ३.५२ ते ५.२० वाजेपर्यंत थांबवली जाईल.

UPI व्यवहारांवरील MDR शुल्काला तूर्तास ब्रेक! सणासुदीत NPCI चा मोठा निर्णय, आता कधीपासून मोजावे लागणार पैसे?

Nalasopara : लग्नाचं आमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार; आणखी ७० ते ८० महिलांच्या शोषणाचाही आरोप

Punjab : फेसबुक लाइव्ह सुरू असतानाच गोळीबार; ड्रग्सविरोधी कार्यकर्ते परविंदर झोटा यांची हत्या, Video

मुंबईकरांनो, पाण्याचा गैरवापर केला तर कारवाई! २०२७ पर्यंतच्या पाणी नियोजनाचे आव्हान, १० टक्के पाणीकपात कायम

Cyber Scam : व्हॉट्सॲपवर आलेल्या 'त्या' मेसेजला 'NO' रिप्लाय करताय? बँक खातं होऊ शकतं रिकामं; पोलिसांचा इशारा