प्रतिकात्मक छायाचित्र 
नवी मुंबई

Navi Mumbai : पनवेलमधील धक्कादायक घटना; अल्पवयीन मुलाचे ६ वर्षीय मुलीवर अत्याचार, स्वतःच व्हायरल केला Video

पनवेल भागात राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने आपल्या शेजारी राहणाऱ्या ६ वर्षीय मुलीसोबत अश्लील कृत्य करून त्याचा आपल्या मोबाईल फोनद्वारे व्हिडीओ तयार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Swapnil S

नवी मुंबई : पनवेल भागात राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने आपल्या शेजारी राहणाऱ्या ६ वर्षीय मुलीसोबत अश्लील कृत्य करून त्याचा आपल्या मोबाईल फोनद्वारे व्हिडीओ तयार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे या अल्पवयीन मुलाने सदरचा अश्लील व्हिडीओ स्नॅपचॅटवर व्हायरल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. पनवेल शहर पोलिसांनी या मुलाला पोक्सो कलमाखाली ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलगा व ६ वर्षीय पीडित मुलगी हे दोघेही पनवेलमध्ये राहण्यास आहेत. गत रविवारी २७ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास या प्रकरणातील अल्पवयीन मुलाने घराबाहेर खेळत असलेल्या पीडित मुलीला आपल्या घरी नेले. त्यानंतर त्याने पीडित मुलीसोबत अश्लील कृत्य केले. यावेळी सदर अल्पवयीन मुलाने मोबाईल फोनद्वारे पीडित मुलीसोबत अश्लील कृत्य करतानाचा व्हिडीओ तयार केला. त्यानंतर सदरचा व्हिडीओ त्याने स्नॅपचॅटवर टाकून व्हायरल केला. व्हायरल झालेला सदरचा व्हिडीओ पीडित मुलीच्या आईपर्यंत पोहोचल्यानंतर तिने पनवेल शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन अल्पवयीन मुलाविरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

राज्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर होण्याची शक्यता; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी, मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार निर्णय

Maharashtra Rain Alert : राज्यभरात पाऊस वाढण्याची धास्ती; कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वादळी पावसाची शक्यता

धाराशिव : नातू अन् आजी अडकले पुरात; खासदार ओमराजे निंबाळकर उतरले थेट पाण्यात, व्हिडिओ व्हायरल

जामीन अर्जांच्या सुनावणीत चालढकल खपवून घेणार नाही; कोर्टाला सहकार्य करण्याचे निर्देश; उच्च न्यायालयाची कठोर भूमिका

मराठा समाजबांधवांना तात्पुरता दिलासा; हैदराबाद गॅझेटविरोधात सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाचा नकार