नवी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुप्तवार्ता पथकाचा धडाका; फसवणूक करणाऱ्या टोळ्यांचे मोडले कंबरडे  
नवी मुंबई

नवी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुप्तवार्ता पथकाचा धडाका; फसवणूक करणाऱ्या टोळ्यांचे मोडले कंबरडे

सर्वसामान्यांची आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी आणि गुन्हे घडण्यापूर्वीच त्याला पायबंद घालण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात स्थापन करण्यात आलेल्या आर्थिक गुप्तवार्ता पथकाने (फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट) वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. केवळ जनजागृतीच नव्हे, तर गुप्त माहितीच्या आधारे धडक कारवाया करत या पथकाने फसवणूक करणाऱ्या टोळ्यांचे कंबरडे मोडले आहे.

Swapnil S

नवी मुंबई : सर्वसामान्यांची आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी आणि गुन्हे घडण्यापूर्वीच त्याला पायबंद घालण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात स्थापन करण्यात आलेल्या आर्थिक गुप्तवार्ता पथकाने (फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट) वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. केवळ जनजागृतीच नव्हे, तर गुप्त माहितीच्या आधारे धडक कारवाया करत या पथकाने फसवणूक करणाऱ्या टोळ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे नागरिकांची मोठया प्रमाणात होणारी संभाव्य फसवणूक रोखण्यात पोलिसांना यश आले आहे.

डिसेंबर २०२३ च्या हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांनी प्रत्येक जिह्यात फायनान्शियल इंटेलिजेन्स युनिट (एफ आय यु) स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. गृहमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी नागरिकांच्या कष्टाचा पैसा सुरक्षित राहावा, या उद्देशाने २०२३ रोजी राज्यात सर्वप्रथम आर्थिक गुप्तवार्ता (एफआययु) या विशेष पथकाची स्थापना केली.

आर्थिक गुप्तवार्ता पथकाने (एफआयु) १ जानेवारी २०२४ पासून आतापर्यंतच्या कालावधीत अनेक धडक कारवाया केल्या. यात आर्थिक गुप्तवार्ता पथकाने जीएसटी विभागाच्या मदतीने बोल्ड विंग या आस्थापनेवर ३६ लाख रुपयांची दंडात्मक कारवाई केली. तसेच आतापर्यंत एकूण २१ गुन्हे दाखल केले असून फसवणुकीच्या ४३ तक्रार अर्जांवर चौकशी सुरु आहे. त्याचप्रमाणे संशयास्पद कंपन्या आणि कार्यालयांची ४९३ वेळा गोपनीय तपासणी करुन संभाव्य फसवणूक टाळण्यात आली आहे. त्याशिवाय नागरिकांना सावध करण्यासाठी आर्थिक गुप्तवार्ता पथकाकडून १३ विशेष कार्यक्रम राबवण्यात आले. तसेच शहरात शेकडो बॅनर्स लावून जनजागृती करण्यात आली.

कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक गुन्हे?

दाखल झालेल्या 21 गुह्यांचे विश्लेषण केले असता, फसवणुकीचे नवे ट्रेंड्स समोर आले आहेत, यात नोकरीचे आमिषाने फसवणूकीचे ६ गुन्हे, अधिकचा परतावा देण्याचे आमिष (पॉन्झी स्कीम): ४ गुन्हे, एमएलएम व रिअल इस्टेट-प्रत्येकी २ गुन्हे. शेअर मार्केट व फॉरेक्स ट्रेडिंग १-१ गुन्हा, तसेच शैक्षणिक प्रवेश, बनावट नोटा आणि विदेशी आयात-निर्यात अशा विविध क्षेत्रांतही पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

सावध राहा! या स्कीम्सपासून दूर राहा

आर्थिक गुप्तवार्ता पथकाने नागरिकांना विशेषतः: पॉन्झी स्कीम, क्रिप्टो करन्सी, शेअर मार्केटमधील अनधिकृत गुंतवणूक आणि कमी वेळात दुप्पट पैसे अशा प्रलोभनांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. बँका किंवा पतपेढयामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्यांची अधिकृतता तपासणे गरजेचे आहे. नागरिकांनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये. कोठेही संशयास्पद गुंतवणूक किंवा फसवणूक होत असल्याचे आढळल्यास तातडीने आर्थिक गुप्तवार्ता पथकाच्या हेल्पलाइनवर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

- प्रेरणा कट्टे, सहाय्यक पोलीस आयुक्त, आर्थिक गुन्हे शाखा, नवी मुंबई

IAF AN-32 Aircraft Crash : जोरहाट विमान दुर्घटनेत ५ जवानांचा मृत्यू; सहवैमानिक जखमी, हवाई दलाकडून चौकशीचे आदेश

सोशल मीडियावर मॅगीची चर्चा; अळ्या आढळल्याचा आरोप फेटाळत नेस्ले इंडियाचे स्पष्टीकरण, FSSAI कडून चौकशी सुरू

Vasai : संतापजनक! फुटबॉलमध्ये करिअरचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर ३ वर्षे लैंगिक अत्याचार; प्रशिक्षकाला अटक

संरक्षण क्षेत्रात भारताचा नवा विक्रम; शत्रूची मिसाइल्स हवेतच उद्ध्वस्त होणार, DRDO च्या सलग ३ चाचण्या यशस्वी, राजनाथ सिंह यांची माहिती

IAF AN-32 Aircraft Crash : लँडिंगदरम्यान अनर्थ! जोरहाटमध्ये भारतीय हवाई दलाचे विमान कोसळले, VIDEO समोर