Navi Mumbai : अनधिकृत इमारत पाडल्याच्या रागातून हत्येची सुपारी; रबाळे गोळीबारप्रकरणी पाच अटकेत 
नवी मुंबई

Navi Mumbai : अनधिकृत इमारत पाडल्याच्या रागातून हत्येची सुपारी; रबाळे गोळीबारप्रकरणी पाच अटकेत

माहिती अधिकारात इमारत अनधिकृत असल्याचे समोर आल्यावर इमारत पाडण्यात आली. याचा राग मनात बाळगून एक वर्षांनी माहिती अधिकार कार्यकर्त्यावर गोळ्या झाडून ठार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच जणांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी चोरीची असल्याचे निष्पन्न झाले आहे.

Swapnil S

नवी मुंबई : माहिती अधिकारात इमारत अनधिकृत असल्याचे समोर आल्यावर इमारत पाडण्यात आली. याचा राग मनात बाळगून एक वर्षांनी माहिती अधिकार कार्यकर्त्यावर गोळ्या झाडून ठार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच जणांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी चोरीची असल्याचे निष्पन्न झाले आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ता अमित मौर्य आणि यांच्यावर सहा एप्रिल रोजी ऐरोली गावातील साईनाथ वाडी येथे गोळीबार करण्यात आला होता. विशाल महाडिक, गुरफान खान, राहुल सहानी, मोहम्मद खान आणि नागेश माने असे यातील आरोपींची नावे आहेत. यातील विशाल आणि गुरफान हे सूत्रधार आहेत.

६ एप्रिलला ऐरोली गावात संदीप गवस व अमित मौर्या यांच्यावर दोन व्यक्तींनी त्यांच्यावर चार गोळ्या झाडल्या होत्या. त्यात एक गोळी गाडीची काच फोडून त्यांच्या मानेला लागली होती. गोळ्या झाडून आरोपी फरार झाले होते, तर मौर्य यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुन्ह्याचा तपास रबाळे पोलीस आणि मध्यवर्ती गुन्हे शाखा समांतररीत्या करीत होते.

या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, पोलीस सह आयुक्त, संजय येनपुरे यांच्या मार्गदर्शनाखालील गुन्हे प्रकटीकरण पथके व गुन्हे शाखा करत होती. आरोपींचा शोध घेण्यासाठी सहा पथके तयार करण्यात आली होती.

इमारत पाडण्यास कारण असल्याने ‘बदला’

आरोपी राहुल सहानी याच्याकडे चौकशी केली असता करता त्याने हा गुन्हा विशाल महाडिक व गुरफान खान यांच्या सांगण्यावरून केला. आरोपी विशाल महाडिक व गुरफान खान यांचा फिर्यादींबरोबर असलेल्या जुन्या भांडणाचा राग मनात धरून तसेच जखमी अमित मौर्या याने १ वर्षापूर्वी माहिती अधिकारांतर्गत अर्ज करून नवी मुंबई मनपा विशाल आणि गुरफान यांचे लागेसंबंध असणाऱ्या एका इमारतीच्या माहिती साठी मनपाला अर्ज केला होता. त्यात ही इमारत अनधिकृत असल्याचे स्पष्ट झाल्यावर या इमारतीवर अतिक्रमण विभागाचा हातोडा पडला होता. याच कारणाने मौर्य याला ठार मारण्याची सुपारी इतर आरोपींना देण्यात आली होती. यात १० हजार रुपये रोख आणि एक सदनिका (वन बीएचके) देण्यात येणार होती.

दिल्लीत मुसळधार पावसाचा तडाखा; खराब हवामानामुळे २६ उड्डाणे रद्द, १५ विमानांचे बदलले मार्ग

'खेलो मुंबई' ॲपद्वारेच होणार नोंदणी; ॲडव्हान्स्ड स्मार्ट टर्फ धोरण लवकरच लागू; पालिका सभागृहाची मंजुरी

Amravati : व्हेंटिलेटरच्या स्फोटामुळे NICU मध्ये आग; ३ नवजात बालकांचा करुण अंत, मुख्यमंत्र्यांकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

Ulhasnagar: घरे-दुकानांवरील 'रुंदीकरणाची टांगती तलवार' दूर होणार; ३६ ऐवजी २४ मीटरचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे

माथेरानमध्ये साथीच्या आजारांचा उद्रेक; दररोज ३० ते ४० रुग्णांवर उपचार; तातडीच्या उपाययोजनांची मागणी