संग्रहित छायाचित्र
नवी मुंबई

कोर्टाला 'डॉग माफिया' म्हणणे पडले महागात; नवी मुंबईतील महिलेला उच्च न्यायालयाचा झटका

कुत्र्यांना खाद्य देण्यावरून दाखल झालेल्या वादाच्या प्रकरणात न्यायालयाला उद्देशून डॉग माफिया म्हणणाऱ्या महिलेला उच्च न्यायालयाने चांगलाच झटका दिला.

Swapnil S

मुंबई : कुत्र्यांना खाद्य देण्यावरून दाखल झालेल्या वादाच्या प्रकरणात न्यायालयाला उद्देशून डॉग माफिया म्हणणाऱ्या महिलेला उच्च न्यायालयाने चांगलाच झटका दिला. न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने याची गंभीर दखल घेत न्यायालयाचा अवमान केल्याच्या आरोपाखाली नवी मुंबईतील आलिशान सीवूड्स इस्टेट सोसायटीतील रहिवासी विनीता श्रीनंदन या महिलेला आठवडाभराचा साधा तुरुंगवास आणि दोन हजार रुपये दंडची शिक्षा ठोठावली.

विनीता श्रीनंदन यांनी सोसायटी आणि कुत्र्यांना खाद्य देणार्‍या व्यक्तींमधील वादाच्या प्रकरणात न्यायालयाला उद्देशून डॉग माफिया म्हटले होते. सोसायटीच्या आवारात भटक्या कुत्र्यांना खाद्य देणार्‍या महिलेला सोसायटीत प्रवेश देण्यास मनाई केल्याबद्दल न्यायालयाने सोसायटीविरुद्ध आदेश दिला होता. त्यावर नाराज झालेल्या विनिता यांनी थेट सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाविरुद्ध आक्षेपार्ह व अपमानजनक टिप्पणी करणारे पत्र परिसरात वाटले होते. त्याची गंभीर दखल खंडपीठाने घेतली.

महिलेने न्यायालयाला उद्देशून डॉग माफिया म्हटले आहे. हे विचार एखाद्या सुशिक्षित व्यक्तीकडून येत नाहीत. महिलेने आमच्यावर वैयक्तिक आरोप केले आहेत. आम्हाला न्यायसंस्थेच्या प्रतिष्ठेची काळजी आहे. न्यायालयाचा अवमान करणारे हे गंभीर कृत्य आहे, असे न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले.

महादेवी हत्तीणीच्या स्थलांतराचे उच्च न्यायालयाचे आदेश; "क्रूर आणि निर्दय वागणूक" असल्याचे निरीक्षण

त्याने बोलावल्यावर हॉटेलमध्ये का जायचीस? रेपचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टाने फटकारले

जुनाट शस्त्रांनी आजची युद्धे कशी जिंकणार? आयात तंत्रज्ञानावर अवलंबून राहणे धोक्याचे: CDS अनिल चौहान यांचे परखड मत

बुमराहने चौथी कसोटी खेळावी! संघाला गरज असताना विश्रांती घेणे चुकीचे; माजी क्रिकेटपटूंचे स्पष्ट मत

मंदिरात चोरी करायला गेला...पण, झोपेने घात केला! पुढे जे झालं ते...VIDEO व्हायरल