तरुणाची अटल सेतूवरून आत्महत्या; उलवे पोलिसांकडून शोधमोहीम सुरू 
नवी मुंबई

तरुणाची अटल सेतूवरून आत्महत्या; उलवे पोलिसांकडून शोधमोहीम सुरू

अटल सेतूवरून समुद्रात उडी मारून पुण्यातील एका २८ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शनिवारी मध्यरात्री घडली.

Swapnil S

नवी मुंबई : अटल सेतूवरून समुद्रात उडी मारून पुण्यातील एका २८ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शनिवारी मध्यरात्री घडली. उलवे पोलीस आणि सागरी सुरक्षा यंत्रणांकडून व्यापक शोधमोहीम राबविण्यात येत आहे.

अटल सेतूवरून उडी मारणाऱ्या तरुणाचे नाव प्रतीक सुभाष रासकर असे असून तो पुण्यातील शिरुर, रांजणगाव येथील खेडकर वस्तीत राहणारा आहे. प्रतीक व्यवसायाने शेअर मार्केटिंग क्षेत्राशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. ७ जून रोजी पहाटे प्रतीकने आपली कार उभी केल्यानंतर त्याने समुद्रात उडी मारल्याचे उघडकीस आले आहे.

आईला आपण बाहेर जेवण करण्यासाठी जात असल्याचे सांगून घरातून आपली कार घेऊन प्रतीक निघाला होता. तेथून त्याने थेट अटल सेतू गाठून समुद्रात उडी टाकली. या घटनेची माहिती मिळताच उलवे पोलिसांसह सागरी सुरक्षा यंत्रणा आणि बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेऊन शोध कार्याला सुरुवात केली.

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणी प्राध्यापक निलंबित; 'त्या' निवेदनावरून संस्थेची माफी

Mumbai : ‘बटरफ्लाय’ रोखणार पाणी गळती; जलवाहिन्यांवर बटरफ्लाय झडपा बसवणार, गणेश खणकर यांच्या मागणीची दखल

Mumbai : चौपाटी, विसर्जनस्थळी चोख व्यवस्थापन; देशभरातील तज्ज्ञांकडून पालिका, पोलिसांचे कौतुक

गणेश विसर्जनासाठी BMC सज्ज; ३८३ कृत्रिम तलावांची व्यवस्था, ६७ नैसर्गिक विसर्जनस्थळांवरही सुविधा, २५ हजार अधिकारी-कर्मचारी तैनात

बार्सिलोनामध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’; महाराष्ट्र मंडळ स्पेनतर्फे गणेशोत्सव, स्पॅनिश कलाकारांचाही सहभाग