नवी मुंबई

...अखेर एनएमएमटी कर्मचारी, अधिकाऱ्यांना वेतन अदा

एनएमएमटीमध्ये काम करणाऱ्या सर्व स्तरातील अधिकारी कर्मचारी, वाहनचालक यांना एप्रिल महिना अर्धा उलटून गेला तरी मार्च महिन्याचे वेतन अदा केले गेले नव्हते.

Swapnil S

नवी मुंबई : एनएमएमटीमध्ये काम करणाऱ्या सर्व स्तरातील अधिकारी कर्मचारी, वाहनचालक यांना एप्रिल महिना अर्धा उलटून गेला तरी मार्च महिन्याचे वेतन अदा केले गेले नव्हते. त्यामुळे अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. याबाबत दै. नवशक्तिने वृत्त प्रसिद्ध करताच प्रशासने सर्वांचे वेतन अदा करण्यात आले आहे.

नवी मुंबई परिवहन उपक्रम अर्थात एनएमएमटीच्या कर्मचारी, अधिकारी वर्गाचे वेतन ढिसाळ कारभारामुळे या महिन्यात झाले नव्हते. याबाबत एनएमएमटी आणि मनपा एकमेकांकडे बोट दाखवत होते. मार्च एन्ड असल्याने वेतन वेळेवर देऊ शकलो नाही, मनपाकडून अनुदान आले नाही, लवकरच होईल, असे कारणे सांगितले जात होते. याबाबत "एनएमएमटीचे वेतन रखडले " या मथळ्याखाली नवशक्तिने वृत्त प्रसिद्ध केले होते. हे वृत्त आल्यानंतर प्रशासकीय पातळीवर वेतन अदा करण्यासाठी वेगवान हालचाली सुरू झाल्या आणि सर्वांचे वेतन अदा करण्यात आले.

वेतन वेळेवर न मिळाल्याने अनेकांचे विविध कर्जाचे हप्ते थकले होते. त्यात तुटपुंज्या वेतनावर काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना कर्जाचे हप्ते सोबतच दैनंदिन खर्च कसा भागवायचा असा प्रश्न पडला होता.

एनएमएमटीमध्ये आस्थापना अधिकारी, कर्मचारी ९३२ , ठोक मानधन चालक ७९९, ठोक मानधन वाहन ५३६, ठोक मानधन मदतनीस ५६ इतर कार्यालयीन मदतनीस अभियंते आदी १७ असा एकूण २ हजार ३८१ चा स्टाफ आहे. या सर्वांचे वेतन सुमारे १० कोटी अदा करण्यात आले आहेत, अशी माहिती एनएमएमटीने दिली आहे.

"भगवा आणि हिंदुत्वाचा विजय"; मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष ठरल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह यांना अश्रू अनावर

2008 Malegaon Blast : 'दंगलींचे शहर' बॉम्बस्फोटाने काळवंडले! मालेगावच्या इतिहासातील काळा दिवस

"भारत-रशियाने मिळून त्यांची आधीच डबघाईस आलेली अर्थव्यवस्था..."; टॅरिफच्या तडाख्यानंतर ट्रम्प यांचा थेट निशाणा

2008 Malegaon Blast : ठोस पुरावेच नाही! साध्वी प्रज्ञा, पुरोहित यांच्यासह सातही आरोपी निर्दोष, १७ वर्षांनंतर आला निकाल

अमेरिकेचा भारताला तडाखा; भारतीय ‌वस्तूंवर १ ऑगस्टपासून २५ टक्के ‘टॅरिफ’