नवी मुंबई

बैलगाडा शर्यतीतील राड्याप्रकरणी राहुल पाटीलला अटक

Swapnil S

नवी मुंबई : पनवेल तालुक्यातील ओवळे गावात भरविण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीत हरल्याचा राग मनात धरून राहुल पाटील व त्याच्या समर्थकांनी विजयी स्पर्धकांच्या समर्थकांवर अंदाधुंद दगडफेक केली होती. त्याचप्रमाणे राहुल पाटील याच्या एका समर्थकाने त्याच्याकडे असलेल्या रिव्हॉल्व्हरमधून बैलगाडा शर्यतीमध्ये जमलेल्या जनसमुदायाच्या दिशेने हवेत एक राऊंड गोळीबार केला होता. या प्रकारानंतर पनवेल शहर पोलिसांनी राहुल पाटील व त्याच्या १५ ते २० समर्थकांवर गुन्हा दाखल करून राहुल पाटीलला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने राहुल पाटीलची दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. पनवेल तालुक्यातील ओवळे गावात राहणाऱ्या शक्ती गायकवाडने पनवेलचे उप विभागीय अधिकारी तथा उप विभागीय दंडाधिकारी यांच्या परवानगीने गत मंगळवारी बैलगाडा शर्यत भरवली होती. या शर्यतीत राहुल पाटील व जयेश पाटीलच्या बैलांमध्ये अटीतटीची शर्यत झाली. या शर्यतीत राहुल पाटीलच्या बैलाचा पराभव करत जयेश पाटीलच्या बैलाने गुलाल उधळला. हा पराभव सहन न झाल्याने राहुल पाटीलच्या समर्थकांनी विजयी बैलाच्या समर्थकांकडे व इतर जनसमुदायाकडे अश्लील हावभाव व आरडाओरडा करून दगडफेक करत शिवीगाळ केली. त्यातील एकाने त्याच्याजवळ असलेल्या रिव्हॉल्व्हरने बैलगाडा शर्यतीमध्ये जमलेल्या जनसमुदायाच्या दिशेने हवेत एक राऊंड गोळीबार केला होता.

या बैलगाडा शर्यतीत झालेल्या गोळीबाराचा दगडफेकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या घटनेची दखल घेत स्वत: या प्रकरणात फिर्यादी होऊन राहुल पाटील व त्याच्या १५ ते २० समर्थकांवर दंगल माजवणे, तसेच शस्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल करून शुक्रवारी राहुल पाटीलला अटक केली. दुपारी राहुल पाटीलला पनवेल येथील न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त