नवी मुंबई

भरधाव कारच्या धडकेत रिक्षाचालकाचा मृत्यू

खासगी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याठिकाणी विजय पाटील याला मृत घोषीत करण्यात आले.

Swapnil S

नवी मुंबई : नवी मुंबई एअरपोर्टवरील प्रवाशांना घेऊन बेलापूरच्या दिशेने जाणाऱ्या रिक्षाला भरधाव कारने धडक दिल्याने झालेल्या अपघातात रिक्षा चालकाचा मृत्यू, तर दोन प्रवाशी गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. पनवेल शहर पोलिसांनी या अपघाताप्रकरणी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या अपघात मृत झालेल्या रिक्षा चालकाचे नाव विजय पाटील (३७) असे असून, तो पनवेल मधील वाघिवली येथे राहत होता. तसेच तो रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करीत होता. रविवारी दुपारी विजय पाटील आपल्या रिक्षामधून दोन प्रवाशांना घेऊन एअरपोर्ट नाका येथून जुन्या कोलीकोपर गाव येथील एअरपोर्ट रोडने बेलापूर येथे जात होता. यावेळी विजय पाटील याची रिक्षा एअरपोर्ट रोडवरील गॅबिनवॉलजवळ आली असताना समोरून येणाऱ्या सॅलेरियो कारने त्याच्या रिक्षाला धडक दिली. त्यामुळे रिक्षा चालक विजय पाटील व दोन प्रवासी अरुण अकलु कुमार व बुबरुवहन तारापोदो कुमार हे तिघे जखमी झाले. त्यामुळे तिघांना उरण नाका येथील खासगी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याठिकाणी विजय पाटील याला मृत घोषीत करण्यात आले.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

‘बटेंगे तो कटेंगे’, ओबीसीने भाजपला तारले