नवी मुंबई

मार्च महिन्यात घरेलू कामगारांचा सुरक्षा लाँग मार्च ; राज्यातील घरेलू महिला कामगारांचा सहभाग

समन्वय समितीच्या माध्यमातून घरेलू कामगारांचे प्रश्न व त्यांचे हित मांडण्यात आलेला नवीन कायद्या सर्वानुमते संमत करण्यात आला.

Swapnil S

नवी मुंबई : राज्यातील ४५ लाख घरेलू कामगारांना श्रमिक म्हणून दर्जा मिळावा, सामाजिक सुरक्षा व इतर अधिकार मिळावेत यासह इतर मागण्यांसाठी येत्या मार्च महिन्यात मुंबईत घरकामगार सामाजिक सुरक्षा लॉंग मार्च काढण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य घरेलू

कामगार समन्वय समितीच्या वतीने घेण्यात आला आहे. खारघर येथील युवा सेंटरमध्ये आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेत हा निर्णय घेण्यात असून या लाँग मार्चमध्ये राज्यभरातील लाखो घरेलू महिला कामगार सहभागी होणार असल्याची माहिती समितीमार्फत देण्यात आली आहे.

घरेलू कामगारांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या संस्था संघटनांची महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार समन्वय समिती ही राज्यस्तरीय समिती आहे. या समितीच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून घर कामगार महिलांच्या प्रश्नांवर संघर्ष सुरू आहे. घर कामगार महिलांचे नेतृत्व विकसित व्हावे, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार समन्वय समितीच्या वतीने खारघर येथील युवा सेंटरमध्ये दोन दिवसीय राज्यव्यापी महिला नेतृत्व क्षमतावृद्धी आणि कृती कार्यक्रम कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेत सर्व श्रमिक संघटना महाराष्ट्राचे कॉम्रेड उदय भट, कॉम्रेड विभुते, घर कामगार एकता युनियन, नवी मुंबईचे राजू वंजारे, राष्ट्रीय घरकामगार चळवळ, महाराष्ट्राचे कॉ. ज्ञानेश पाटील, महाराष्ट्र महिला परिषद-नवी मुंबईच्या वंदना चिंचोळीकर, आनंद आधार संघटना पुणेच्या अनिता गोरे, रामामाता बहुद्देशीय सेवाभावी संस्था लातूरचे दशरथ जाधव, विदर्भ मोलकरीण संघटना नागपूरच्या सुजाता भोंगाडे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत कॉम्रेड उदय भट यांनी घरेलू कामगारांचा इतिहास, त्यांच्या संघर्षाची पार्श्वभूमी, आणि सध्यस्थितीत आपल्या आंदोलनाची दिशा याबाबत माहिती दिली.

महाराष्ट्रातील विविध संघटनांचा समावेश

या कार्यशाळेत महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यात घरेलू कामगारांच्या प्रश्नाला घेऊन कार्यरत संस्था संघटनेचे प्रतिनिधी मुंबई, मुंबई उपनगर, नवी मुंबई, पनवेल, ठाणे, कल्याण, शहाड, उल्हासनगर, पुणे, पिंपरी , लातूर, नागपूर इत्यादी जिह्यातील कामगार एकता युनियन, राष्ट्रीय घरकामगार चळवळ, सर्व श्रमिक संघटना, महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार युनियन, रामामाता बहुद्देशीय सेवाभावी संस्था, विदर्भ मोलकरीण संघटना, आनंद आधार, शाक्य, महामाया, प्रयास एक कोशिश, महाराष्ट्र महिला परिषद, सलाह, साऊ संगीती, या संस्था संघटनेचे कार्यकर्ते प्रतिनिधी सहभागी झाले होते.

कामगाराचे शोषण झाल्यास आंदोलनाची हाक

समन्वय समितीच्या माध्यमातून घरेलू कामगारांचे प्रश्न व त्यांचे हित मांडण्यात आलेला नवीन कायद्या सर्वानुमते संमत करण्यात आला. त्याचप्रमाणे यावेळी महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार समन्वय समितीच्या वतीने कृती कार्यक्रम ठरविण्यात आला. यात कामाच्या ठिकाणी समन्वय समितीचे बोर्ड लावणे. एखाद्या घरेलू महिला कामगाराचे शोषण झाल्यास सार्वत्रिक संप किंवा आंदोलनाची हाक देणे. घरेलू कामगारांच्या प्रश्नाला घेऊन प्रचार व प्रसार करणे. त्याचप्रमाणे घरेलू कामगार समन्वय समितीच्या वतीने मार्च २०२४ मध्ये मुंबईत घरकामगार सामाजिक सुरक्षा लाँग मार्च काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी