नवी मुंबई

नेरूळमध्ये सहा बांगलादेशी नागरिकांना अटक

नेरूळ पोलिसांनी नेरूळ सेक्टर-१४ मधील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर छापा मारून त्याठिकाणी बेकायदेशीररित्या वास्तव्यास असलेल्या सहा बांगलादेशी नागरिकांची धरपकड केली आहे.

Swapnil S

नवी मुंबई : नेरूळ पोलिसांनी नेरूळ सेक्टर-१४ मधील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर छापा मारून त्याठिकाणी बेकायदेशीररित्या वास्तव्यास असलेल्या सहा बांगलादेशी नागरिकांची धरपकड केली आहे. सदरचे बांगलादेशी नागरिक मागील वर्षभरापासून त्याच इमारतीच्या बांधकाम साईटवर काम करून त्याच ठिकाणी राहत असल्याचे तपासात आढळून आले आहे.

नेरूळमधील सेक्टर १४ येथे सी रिजन्सी या विकासकाच्या साईटवर काही बांगलादेशी नागरिक राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार बांधकाम साईटवर छापा मारून सहा बांगलादेशी नागरिक मागील वर्षभरापासून बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असल्याचे आढळून आले. त्यानुसार पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस