नवी मुंबई

मुलींवर अत्याचारप्रकरणी मुख्याध्यापिकेसह चौघांचे निलंबन, बदलापूरमधील घटना

बदलापूर पूर्व येथील एका नामांकित शाळेत दोन लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणावरून स्थानिक पोलीस आणि शाळा प्रशासनावर टिकेची झोड उठवली जात असतानाच आता शाळेने माफीनामा जाहीर केला आहे.

Swapnil S

बदलापूर : बदलापूर पूर्व येथील एका नामांकित शाळेत दोन लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणावरून स्थानिक पोलीस आणि शाळा प्रशासनावर टिकेची झोड उठवली जात असतानाच आता शाळेने माफीनामा जाहीर केला आहे. याप्रकरणी मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आले असून मुलांची जबाबदारी असलेल्या दोन सेविकांना सेवेतून कमी करण्यात आले आहे. तसेच हलगर्जीपणा करणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांची उचलबांगडी करण्यात आली आहे.

मंगळवारी सजग नागरिकांनी शाळेविरुद्ध आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी हा खटला फास्टट्रॅकवर चालवण्याची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तर शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी याप्रकरणी कठोर पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत.

या प्रकरणात पालकांना झालेल्या मनस्तापाबद्दल संस्थेने त्यांची जाहीर माफी मागितली असून त्यांना कायदेशीर मदत देऊ केली आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी सर्व पालक, विद्यार्थी आणि शहरातील सजग नागरिकांना संस्थेने शांततेचे आवाहन केले आहे. कोणत्याही प्रकारच्या चर्चेसाठी संस्था तयार असल्याचेही संस्थेचे अध्यक्ष उदय कोतवाल म्हणाले.

शाळा गाठणाऱ्या विद्यार्थ्यांना एसटी दिलासा देणार; शालेय विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन; एसटी बस रद्द झाल्यास मिळणार तत्काळ मदत

ठाण्यातील मतदार यादीत घोळ; साडेचार लाख मतदार वाढले कसे? - मनसेचा आरोप; निवडणूक अधिकारी लग्नात व्यस्त

आज होणाऱ्या TET परीक्षेसाठी ४ लाख ७५ हजारांहून अधिक नोंदणी; गैरप्रकार रोखण्यासाठी CCTV सह Ai तंत्रज्ञानाचा वापर

बाणगंगा तलाव पुनरुज्जीवन दुरुस्तीच्या कामाला ब्रेक; पुरातत्त्व विभागीय कार्यालयाची कारवाई

मराठी शाळा बंदचा डाव! मुंबई मुख्याध्यापक संघटनेचा आरोप; निर्गमित आदेश मागे घेण्याची मागणी