ठाणे-बेलापूर मार्गावरील अपघातात दोघांचा मृत्यू 
नवी मुंबई

Navi Mumbai : ठाणे-बेलापूर मार्गावर भीषण अपघात; जावई अन् सासऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

ठाणे-बेलापूर मार्गावरील पावणे एमआयडीसी परिसरात बुधवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात जावई आणि सासऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Swapnil S

नवी मुंबई : ठाणे-बेलापूर मार्गावरील पावणे एमआयडीसी परिसरात बुधवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात जावई आणि सासऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुचाकीला धडक देणाऱ्या अज्ञात वाहनचालकाने घटनास्थळावरून पलायन केले. याप्रकरणी तुर्भे पोलिसांनी गुन्हा दाखल करून फरार चालकाचा शोध सुरू केला आहे.

या अपघातात राज पंचम जैसवार (४२) आणि त्यांचे सासरे शिवमुरत रामलोचन जैसवाल (६१) यांचा मृत्यू झाला. दोघेही खैरणेगाव येथील रहिवासी होते. बुधवारी सायंकाळी राज हे आपल्या सासऱ्यांसोबत स्कुटीवरून ठाण्याच्या दिशेने जात होते. सायंकाळी सव्वासातच्या सुमारास त्यांची स्कुटी पावणे एमआयडीसीतील खैरणे पुलाखालील नाल्याजवळ आली असता, पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या स्कुटीला जोरदार धडक दिली.

धडक इतकी भीषण होती की दोघेही रस्त्यावर फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले. त्यांना महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

७०२ कोटींचा प्रस्ताव मंजूर; सायन्स सेंटर मेट्रो स्थानक ते वरळी प्रॉमेनेड जोडणाऱ्या पादचारी पुलाचा मार्ग मोकळा

Navi Mumbai : उरणला साथीच्या आजारांचा विळखा; रुग्णालयांत रुग्णांची गर्दी

ST सहकारी बँकेत ३४ कोटींचा गैरव्यवहार? खरेदी व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी

अखिल भारतीय गांधी साहित्य संमेलन ऑक्टोबरमध्ये; तुषार गांधी यांची माहिती

AI मुळे जाहिराती क्षेत्रात संधी; महागड्या माध्यमांवर जाहिरात करणे उद्योगांना शक्य