(प्रातिनिधिक छायाचित्र)
नवी मुंबई

रबाळे येथील चावंडाआई मंदिराची दानपेटी फोडली

अज्ञात चोरट्याने रबाळे तलावाजवळ असलेल्या चावंडाआई (गावदेवी मंदिर) मंदिराच्या खिडकीची ग्रील उचकटून...

Swapnil S

नवी मुंबई : अज्ञात चोरट्याने रबाळे तलावाजवळ असलेल्या चावंडाआई (गावदेवी मंदिर) मंदिराच्या खिडकीची ग्रील उचकटून मंदिराच्या गाभाऱ्यात असलेल्या दानपेटीतील सुमारे ५० हजाराची रोख रक्कम चोरून नेल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली. रबाळे एमआयडीसी पोलिसांनी या चोरट्याविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

रबाळे गावात राहणारा मिनेश म्हात्रे (२८) हा रबाळे तलावाजवळ असलेल्या चावंडाआई देवीच्या मंदिरात पुजारी म्हणून काम करतो. त्यामुळे तो दररोज सकाळी ८.३० वाजता मंदीर उघडतो व रात्री ९ वाजता बंद करतो. त्यामुळे मंदिराची चावी त्याच्याकडे असते. सोमवारी मिनेश म्हात्रे हा कामानिमित्त बाहेर गेला असल्याने त्याच्या लहान भावाने मंदीर उघडून पूजाअर्चा केली होती. त्यांनतर रात्री ९ वाजता मंदिर बंद केले होते. मिनेश म्हात्रे हा रात्री ११ वाजता घरी येऊन झोपी गेला. पहाटे पावणे तीन वाजण्याच्या सुमारास त्याला अचानक जाग आल्यानंतर त्याने आपल्या मोबाईलवर मंदिराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पाहणी केली.

यावेळी त्याला देवीच्या मूर्ती शेजारील दान पेटीचा दरवाजा उघडा असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्याने तत्काळ मंदिराचे अध्यक्ष दिलीप पाटील यांना फोनद्वारे याबाबतची माहिती देऊन मंदिरात धाव घेतली. यावेळी अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या दक्षिण बाजूकडील खिडकी उचकटून मंदिरात प्रवेश केल्याचे तसेच मंदिरातील दानपेटीचे लॉक तोडून त्यातील सुमारे ५० हजाराची रोख रक्कम चोरून नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Video : नेपाळमध्ये महाप्रलय! भोटे कोशी नदीला अचानक महापूर; अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती, किमान १०५ भारतीय पर्यटक बेपत्ता

शासकीय, खासगी, धर्मादाय रुग्णालयांचे फायर ऑडिट; तातडीने कार्यवाही करण्याचे आरोग्य मंत्र्यांचे निर्देश, राज्य सरकार ॲक्शन मोडवर

Pune : भटक्या कुत्र्याचा महिलेवर हल्ला; तोल जाताच बाळ पडलं खाली, Video व्हायरल

Mumbai : निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता; राजावाडी रुग्णालयातील अन्य डॉक्टरांवर ताण, दिवसाला ५०० रुग्णांची तपासणी

Madhya Pradesh : भाजप आमदाराने अग्निशमन दलाच्या वाहनाने धुतली स्वतःची कार; VIDEO व्हायरल