File Photo 
नवी मुंबई

सेव्हन्थ स्काय बारमधील हुक्का पार्लरवर दुसऱ्यांदा कारवाई

Swapnil S

नवी मुंबई : एपीएमसी पोलिसांनी पामबीच गॅलेरीया मॉलमधील सेव्हन्थ स्काय बार अँड रेस्टॉरंटमध्ये बेकायदेशीरीत्या सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर पुन्हा एकदा छापा मारून हुक्का पार्लरचालक व वेटर अशा दोघांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी हुक्का ओढण्यासाठी लागणारे साहित्य व वेगवेगळ्या प्रकारचे हुक्का फ्लेवर जप्त केले आहेत. गत २५ डिसेंबर रोजी सुद्धा पोलिसांनी या रेस्टॉरंटमध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर छापा मारून तिघांना अटक केली होती.

एपीएमसीतील पामबीच गॅलेरीया मॉलमधील पाचव्या मजल्यावर सुरू असलेल्या सेव्हन्थ स्काय बार ॲण्ड रेस्टॉरंटमध्ये छुप्या पद्धतीने हुक्का पार्लर चालविण्यात येत असल्याची माहिती एपीएमसी पोलिसांना मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक निलेशकुमार महाडिक व त्यांच्या पथकाने बुधवारी सायंकाळी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास सेव्हन्थ स्कायबार ॲण्ड रेस्टॉरंटवर छापा मारला. यावेळी सदर रेस्टॉरंटमध्ये काही व्यक्ती हुक्का ओढत बसल्याचे आढळून आले. तसेच त्या ठिकाणी निकोटीनबाबत जनजागृतीपर फलक, न लावता तसेच नो स्मोकिंग झोनबाबत उपाययोजना न करता ग्राहकांना हुक्का पुरविण्यात येत असल्याचे आढळून आले.

त्यामुळे पोलिसांनी सदर रेस्टॉरंटमधून हुक्का ओढण्यासाठी लागणारे साहित्य व वेगवेगळ्या प्रकारचे हुक्का फ्लेवर जप्त केले. त्यानंतर पोलिसांनी सदर रेस्टॉरंटचा मॅनेजर तुषार अनंता झिंजाड (३१) आणि वेटर रहुल अब्दुल मन्नान (२६) या तिघाविरोधात गुन्हा दाखल करून दोघांना ताब्यात घेतले आहे.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त