संग्रहित छायाचित्र
नवी मुंबई

नवी मुंबई पोलीस दलात बदल्या; ५ सहाय्यक पोलीस आयुक्त व ६ पोलीस निरीक्षकांची बदली

नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पोलीस आस्थापना मंडळाकडून आलेल्या शिफारशींनुसार, शुक्रवारी पोलीस आयुक्तालयातील ३ सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या केल्या आहेत.

Swapnil S

नवी मुंबई : नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पोलीस आस्थापना मंडळाकडून आलेल्या शिफारशींनुसार, शुक्रवारी पोलीस आयुक्तालयातील ३ सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या केल्या आहेत. तसेच नव्याने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात दाखल झालेल्या २ सहाय्यक पोलीस आयुक्तांना पदभार देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पोलीस निरीक्षक दर्जाच्या ५ अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करतानाच २ पोलीस ठाण्याच्या प्रभारींचे खांदेपालट केले आहेत. तसेच नव्याने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात दाखल झालेल्या एका पोलीस निरीक्षकाला पदभार देण्यात आला आहे.

तुर्भे विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल गायकवाड यांची अमरावती ग्रामीण येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून बदली झाल्याने रिक्त झालेल्या तुर्भे विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्तपदी नवी मुंबई विशेष शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त मयुर भुजबळ यांची बदली करण्यात आली आहे. तर नवी मुंबई विशेष शाखेच्या सहाय्यक पोलीस आयुक्तपदी पुणे ग्रामीण पोलीस आयुक्तालयातून बदली होऊन नवी मुंबईत आलेले उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले यांची नेमणूक करण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे नवी मुंबई पोलीस प्रशासन विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त धर्मपाल बनसोडे यांची गुन्हे शाखा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या सहाय्यक आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

नेरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी भगत यांची पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून, तर रबाळे पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवडी यांची नेरूळ पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक माणिक नलावडे यांची वाशी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकपदी तर उरण वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक वैशाली गलांडे यांची खारघर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. याशिवाय रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांची गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे. तर रायगड येथून बदली होऊन पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ याची रबाळे एमआयडीसीच्या वरिष्ठ निरीक्षकपदी नेमणूक करण्यात आली आहे.

एकत्र आणणं माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल

उद्धव ठाकरे यांचे आक्रमक भाषण; म्हणाले ''हिंदू आणि हिंदुस्थान मान्य आहे; पण हिंदीची सक्ती मान्य नाही!''

''कुठचाही 'झेंडा' नाही, मराठी हाच 'अजेंडा'; माझ्या मराठीकडे-महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने पाहायचं नाही,'' वाचा राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण

दोघा पुतण्यांचे हात धरून सुप्रिया सुळेंनी काकांच्या शेजारी केलं उभं; पहा Video

''जर इथे येऊन धंदा करताय तर मराठी बोलायची लाज कसली?'' अभिनेते भरत जाधव यांचा संतप्त सवाल