Navi Mumbai : महसूल बुडवणाऱ्या नंबरप्लेटचा गेम उघड; स्वत:च्या गाड्यांवर लावली दुसऱ्याची नंबरप्लेट  'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
नवी मुंबई

Navi Mumbai : महसूल बुडवणाऱ्या नंबरप्लेटचा गेम उघड; स्वत:च्या गाड्यांवर लावली दुसऱ्याची नंबरप्लेट

शासनाचा महसूल चुकवण्यासाठी आणि प्रशासनाची दिशाभूल करण्यासाठी एका ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकाने आपल्या ट्रान्सपोर्टमधील गाड्यांवर दुसऱ्याच गाड्यांच्या नंबरप्लेट लावून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे.

Swapnil S

नवी मुंबई : शासनाचा महसूल चुकवण्यासाठी आणि प्रशासनाची दिशाभूल करण्यासाठी एका ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकाने आपल्या ट्रान्सपोर्टमधील गाड्यांवर दुसऱ्याच गाड्यांच्या नंबरप्लेट लावून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. मूळ वाहनाच्या मालकाला ट्रफिक पोलिसांचे दंडाचे चालान आल्यानंतर हा प्रकार उघडकीला आला. सानपाडा पोलिसांनी बनावट नंबरप्लेट लावून फसवणूक करणाऱ्या ट्रान्सपोर्ट मालकासह चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे.

तक्रारदार शौकत अली अन्सारी यांचा मुंबईत डेकोरेटर्सचा व्यवसाय असून त्यांनी आपल्या व्यावसायासाठी गत फेब्रुवारी महिन्यामध्ये नवीकोरी बोलेरो पिकअप गाडी खरेदी केली होती. ही गाडी एप्रिल महिन्यापर्यंत बॉडी बनवण्यासाठी गॅरेजमध्ये होती. मात्र, गाडी रस्त्यावर येण्यापूर्वीच अन्सारी यांना त्यांच्या मोबाईलवर ट्राफिक पोलिसांचे २ हजार रुपयांचे दंड आल्याचे मेसेज आले. गाडी गॅरेजमध्ये असताना त्यांना दंडाचे चालान आल्याने त्यांनी याचा शोध सुरू केला. या दरम्यान, ५ मे रोजी रात्री अन्सारी यांच्या पिकअप गाडीच्या नंबरची तंतोतंत नंबर प्लेट असलेली दुसरी गाडी अन्सारी यांच्या चालकाला जुईनगर येथे निदर्शनास आली. तेव्हा अन्सारींनी लागलीच पोलिसांना पाचारण केले.

मुंबईकरांना मिळणार पुनर्प्रक्रिया केलेले पिण्यायोग्य पाणी; भांडुपमध्ये तृतीय स्तरावरील प्रक्रिया केंद्राला मंजुरी, १ हजार ८२४ कोटींचा प्रकल्प

Mumbai : वन्यजीव तस्करी टोळीचा DRI कडून पर्दाफाश; बंदिस्त अवस्थेतील दुर्मिळ प्राण्यांची सुटका

उपनगरातही मुद्रांक शुल्क घोटाळा; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची कबुली; सरकारी तिजोरीचे १० कोटींचे नुकसान

म्हाडाला सदनिकेची किंमत वाढवण्याचा अधिकार; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

'एसआयआर'खाली सहा कोटी मतदार 'कटाप'