Navi Mumbai : मोबाईल लिंकद्वारे वाहतूकदाराला गंडा; सायबर चोराविरुद्ध गुन्हा दाखल  (संग्रहित छायाचित्र)
नवी मुंबई

Navi Mumbai : मोबाईल लिंकद्वारे वाहतूकदाराला गंडा; सायबर चोराविरुद्ध गुन्हा दाखल

एका सायबर चोरट्याने कळंबोलीत राहणाऱ्या वाहतूक व्यावसायिकाला गाडीवर वाहतूक चलन बजावल्याचा बनावट संदेश पाठवून त्यातील लिंकद्वारे मोबाईल हॅक करून त्याच्या बँक खात्यातून ५ लाख २० हजार रुपये लंपास केल्याची घटना समोर आली आहे.

Swapnil S

पनवेल : एका सायबर चोरट्याने कळंबोलीत राहणाऱ्या वाहतूक व्यावसायिकाला गाडीवर वाहतूक चलन बजावल्याचा बनावट संदेश पाठवून त्यातील लिंकद्वारे मोबाईल हॅक करून त्याच्या बँक खात्यातून ५ लाख २० हजार रुपये लंपास केल्याची घटना समोर आली आहे. तळोजा पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात सायबर चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरू केला आहे.

तक्रारदार कासीम कारदअली शेख यांचा तळोजा एमआयडीसीत ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. १९ सप्टेंबरला सायबर भामट्यांनी त्यांच्या गाडीवर वाहतूक पोलिसांनी वाहतूक चलान बजावल्याचे बनावट संदेश पाठवले. गाड्या पार्किंगमध्ये असतानाही चलन कसे काय आले, असा संशय आल्याने त्यांनी संदेशातील लिंक उघडली असता, त्यांना मोबाईल अपडेट करण्यास सांगण्यात आले.

शेख यांनी गुगल पे आणि फोन पे पुन्हा सुरू करताच ओटीपी येण्यास सुरुवात झाली. त्यामुळे त्यांनी तातडीने जुने सिमकार्ड बंद करून नवीन सिमकार्ड घेतले. शेख यांनी आपल्या ॲप्सद्वारे खात्याची माहिती तपासली असता, त्यांच्या बँकेच्या खात्यातून पाच व्यवहारांत ५ लाख २० हजार रुपये डेबिट झाल्याचे निदर्शनास आले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

पाणी टंचाईने ठाणेकर हैराण; जलशुद्धीकरण केंद्रातील काम लांबल्याने पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले

Mira-Bhayandar : कृत्रिम तलावांतील मूर्तींवर जेसीबीने भराव; पालिका अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

ठाण्यातील आरोग्य केंद्रांवर करडी नजर

४-जी स्मार्टफोनची बाजारपेठ वाढणार; ५-जी महागल्याने बजेट श्रेणीत ४जी मोबाईल्सना मागणी

दुष्काळ पाहणीसाठी महाराष्ट्रात पथक पाठवणार; केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांची घोषणा