नवी मुंबई

नवी मुंबईतून दोन बांगलादेशी अटकेत

कामोठे भागात बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असलेल्या २ बांगलादेशी नागरिकांना पनवेल शहर पोलिसांनी पुष्पक नगर भागात सापळा रचून अटक केली आहे.

Swapnil S

नवी मुंबई : कामोठे भागात बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असलेल्या २ बांगलादेशी नागरिकांना पनवेल शहर पोलिसांनी पुष्पक नगर भागात सापळा रचून अटक केली आहे. या कारवाईत अटक करण्यात आलेल्या एका बांगलादेशी नागरिकाने भारतील ओळखीचा पुरावा असलेले बनावट आधार कार्ड बनवून घेतल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी सदरचे आधारकार्ड जप्त करून त्याबाबत पुढील तपास सुरू केला आहे.

भारतात अवैधरीत्या वास्तव्यास असलेले दोन बांगलादेशी नागरिक पनवेलमधील पुष्पक नगर भागात येणार असल्याची माहिती पनवेल शहर पोलिसांना मिळाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी सदर व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिल्याने पनवेल शहर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघ व त्यांच्या पथकाने रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पुष्पक नगर सेक्टर-८ मधील फ्लॉट नंबर ४९ जवळ सापळा लावला होता. यावेळी त्या भागात शेख इकबालभाई नंदुभाई (४१) व राहुल इकबाल शेख (२०) हे दोघे संशयास्पदरीत्या आले असता, पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. दोघांची अधीक चौकशी केली असता, त्यांनी कामोठे सेक्टर-१२ मध्ये काना दयाबंधु सोसायटीत राहत असल्याचे सांगितले. त्यामुळे सदर व्यक्ती बांगलादेशी नागरिक असल्याचे व त्यातील शेख इकबालभाई नंदुभाई याच्याकडे बनावट आधार कार्ड असल्याचे आढळून आले.

त्यामुळे पोलिसांनी दोघांना अटक करून त्यांच्याजवळ असलेले बनावट आधारकार्ड जप्त करून पुढील कार्यवाहीला सुरुवात केली आहे.

BMC Election : आज मतदान; मुंबईच केंद्रस्थानी; बोटावर उमटणार लोकशाहीचा ठसा, तरुणाईमध्ये उत्साहाचे वातावरण

मतदानानंतर लगेच पुसली जाते बोटावरची शाई; मनसेच्या महिला उमेदवाराचा दावा; काँग्रेसच्या सचिन सावंतांनी तर प्रात्यक्षिकच दाखवलं - Video

BMC Elections 2026: 'व्होटर स्लिप्स'चा गोंधळ; अनेक मतदार मतदान न करताच परतले

Thane Election : व्होटर स्लिपमध्ये घोळ; नाव, अनुक्रमांक बरोबर; पत्ते मात्र बदलले

BMC Elections 2026: मुंबईत मतदानाला झाली सुरूवात; आज काय सुरू, काय बंद?