गणेश नाईक  संग्रहित छायाचित्र
नवी मुंबई

वाढीव गावठाणचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवणार; वनमंत्री गणेश नाईक यांचे प्रतिपादन

उरण नवी मुंबईतील उरण, पनवेल आणि बेलापूर भागातील गरजेपोटी बांधलेली घरांचा आणि वाढीव गावठाणाचा प्रश्न आणि प्रलंबित प्रकल्पग्रस्ताचे प्रश्न महिनाभरात कायमस्वरूपी सोडवणार असल्याचे प्रतिपादन वनमंत्री गणेश नाईक यांनी केले.

Swapnil S

उरण : उरण नवी मुंबईतील उरण, पनवेल आणि बेलापूर भागातील गरजेपोटी बांधलेली घरांचा आणि वाढीव गावठाणाचा प्रश्न आणि प्रलंबित प्रकल्पग्रस्ताचे प्रश्न महिनाभरात कायमस्वरूपी सोडवणार असल्याचे प्रतिपादन वनमंत्री गणेश नाईक यांनी केले. १९८४ च्या शेतकरी लढ्यातील हुतात्म्यांच्या ४१ व्या स्मृतिदिनानिमित्त जासई येथील कार्यक्रमात ते बोलत होते.

महात्मा फुले सामाजिक प्रबोधन व परिवर्तन प्रतिष्ठान जासईच्या वतीने दरवर्षी हा स्मृतिदिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. गणेश नाईक यांनी पुढे सांगताना दि. बा. पाटील यांनी ८४ चा लढा उभारताना पक्षीय मतभेद सारून लढा उभारला होता. दि.बा. पाटील हे डाव्या विचारसरणीचे असून सुद्धा अनेक उजव्या सरणीच्या लोकं त्यांच्या आंदोलनात त्यावेळी सहभागी झाली होती. या आंदोलनात पाच शेतकऱ्यांनी बलिदान दिले होते. आत्ता या आंदोलनाला ४१ वर्षे झाली असून या ४१ वर्षात या हुतात्म्यांच्या कुटुंबीयांनी किती वेदना, दु:ख सहन केल्या असतील याची आपल्याला जाणीव ठेवायला हवी. या कुटुंबीयांना काही उणीवा असतील तर मी स्वतः त्यांच्या पाठीशी राहीन. असे सांगून नवी मुंबईतील विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात येईल असा ठाम विश्वास व्यक्त केला, तर माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी आपल्या भाषणात प्रकल्पग्रस्तांच्या व्यथा मांडल्या. प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी घेऊन २०-२५ वर्षे झाली तरी त्या ठिकाणी प्रकल्प येत नसेल तर त्या जमिनी शेतकऱ्यांना परत कराव्यात. शेतकऱ्यांच्या अनेक जमिनी खारलँड विभागाने बांध बंधिस्तीची कामे न केल्यामुळे नापिकी झाल्या आहेत त्या ठिकाणी खारफुटी झाल्यामुळे त्या ठिकाणी कोणताही विकास करता येत नाही त्यामुळे अशा जमिनींबाबत धोरण ठरविणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश बालदी, आमदार प्रशात ठाकूर, दि. बां.चे चिरंजीव अतुल पाटील यांची

भाषणे झाली.

या कार्यक्रमाला मंत्री गणेश नाईक, मा. खासदार रामशेठ ठाकूर, खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार विक्रांत पाटील, माजी खासदार संजीव नाईक, उद्योगपती जे. एम. म्हात्रे, जगदीश गायकवाड, अतुल पाटील, काँ. जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, प्रीतम म्हात्रे, जेएनपीए विश्वस्त रवींद्र पाटील, दिनेश पाटील, माजी विश्वस्त भूषण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

GST आता फक्त ५ आणि १८ टक्के; नवीन दराचा ‘घट’ २२ सप्टेंबरपासून

मराठा आरक्षणाच्या जीआरवरून OBC नेत्यांमध्ये मतमतांतरे; जीआर प्रत फाडत लक्ष्मण हाके यांचे आंदोलन; भुजबळांचा कोर्टात जाण्याचा इशारा

Maratha Reservation Protest : सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसान भरपाईचे काय? उच्च न्यायालयाचा मराठा आयोजकांना सवाल

Mumbai : २३८ एसी लोकल खरेदीला मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४८२६ कोटींची मान्यता

कोकणातून परतणाऱ्या गणेशभक्तांचे हाल; मुंबई-गोवा महामार्गावर ३ किमीपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा